जिल्हा परिषद निवडणूकी दरम्यान शहापूर पोलिसांची धडक कारवाई  – eNavakal
निवडणूक महाराष्ट्र

जिल्हा परिषद निवडणूकी दरम्यान शहापूर पोलिसांची धडक कारवाई 

शहापूर-  ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक सुरळीत पार पडावी यासाठी शहापूर पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी धडक कारवाई सुरू करित विविध गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे .
        येत्या 13 तारखेला ठाणे जिल्हा परिषद व शहापूर पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे तर 14 ला मतमोजणी आहे . दरवेळेस निवडणुकी दरम्यान तालुक्यात घडणाऱ्या हाणामारीच्या घटना टाळण्यासाठी शहापूर पोलिसांनी कंबर कसली आहे . शहापूर पोलीस स्टेशन व खर्डी पोलीस चौकी कार्यक्षेत्रात  येणाऱ्या जिल्हा परिषद मतदार संघात यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांमधील आरोपींना 149 , 151 प्रमाणे नोटिसा पाठवीत दोन दिवसात शहापूर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे फर्मान धाडल्याने आरोपींमध्ये घबराट पसरली आहे . पोलीस ठाण्यात आलेल्या आरोपींवर  पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे .
           शहापुरातील विविध राजकीय पक्षांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक व्यक्तींचा समावेश असल्याने निवडणुकीत कोणत्याही प्रकारची गडबड न होण्यासाठी हा खबरदारीचा उपाय केल्याचे पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More