जिग्नेश मेवाणीचा ‘व्हॅलेंटाइन डे’वरुन मोदींना टोला – eNavakal
देश राजकीय

जिग्नेश मेवाणीचा ‘व्हॅलेंटाइन डे’वरुन मोदींना टोला

गुजरात – ‘व्हॅलेंटाइन डे’वरुन गुजरातमधील आमदार आणि दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ‘मला अनेकांनी ‘आय लव्ह यू’ म्हटले आहे. पण नरेंद्र मोदींना कधी कोणी आय लव्ह यू म्हटले असेल का? असा उपरोधिक प्रश्न त्यांनी विचारला आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जिग्नेश मेवाणींनी भाजप, संघ व नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पहिल्या ट्विटमध्ये मेवाणींनी देशभरात चर्चेची विषय ठरलेली नवोदित अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियरचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘हा व्हायरल व्हिडिओ संघाला दिलेले सडेतोड प्रत्युत्तर आहे. भारतीयांनी द्वेषाऐवजी प्रेमाला पसंती दिली आहे. सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये जिग्नेश मेवाणींनी थेट नरेंद्र मोदींना टोला लगावला. ‘मला अनेकांनी आय लव्ह यू म्हटले आहे. पण मोदींना कधी कोणी आय लव्ह यू म्हटले असेल का?, मला तर शंकाच आहे, तुमचे मत काय?, असे त्यांनी म्हटले आहे. जिग्नेश मेवाणींच्या या ट्विटवर अनेकांनी टीका केली. तुम्हाला कोणी आय लव्ह यू म्हटलं असेल यावर आम्हाला शंकाच असल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीविषयी अशा स्वरुपाचे ट्विट करणे कितपत योग्य असे काही युजर्सने म्हटले आहे. ‘नरेंद्र मोदींचे देशाच्या जनतेवर प्रेम आहे व देशातील जनतेचे मोदींवर प्रेम आहे, असे एका युजरने म्हटले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More