जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कचा वापरल्यास लागणार 6 पैसे शुल्क – eNavakal
News महाराष्ट्र

जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कचा वापरल्यास लागणार 6 पैसे शुल्क

मुंबई – आतापयर्र्ंत रिलायन्स जिओवर व्हाईस कॉलींग फ्री होते. ग्राहकांकडून फक्त इंटरनेट पॅक रिचार्ज करण्याचे पैसे भरावे लागत होते. मात्र आता यापुढे प्रतिस्पर्धी कंपनीच्या नेटवर्कवर व्हाईस कॉल केल्यास रिलायन्स जिओ प्रति मिनिटासाठी 6 पैसे शुल्क आकारणार आहे. रिलायन्स जिओकडून आज ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी आतापर्यंत पूर्णपणे फ्री असलेली व्हॉईस कॉलिंगची सुविधा संपुष्टात आली आहे.
जिओवरून व्हाईस कॉलिंग सेवा मोफत देण्यात येत असल्याने कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना ट्रायच्या नियमानुसार 13,500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागत होती. त्यामुळे आता जिओने ट्रायच्या नियमांपासून वाचण्यासाठी अन्य नेटवर्कवर कॉलिंग सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच इनकमिंग सेवा पुर्वीप्रमाणेच मोफत असणार आहे, असे जिओकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिओ ग्राहकांना जिओ व्यतिरिक्त कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहे.10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आऊटगोर्ईंग कॉलसाठी इंटरकनेक्ट युजेस चार्ज रिचार्जसाठी व्हाऊचर्स घ्यावी लागणार आहेत. तसेच प्रत्येक 10 रुपयाच्या रिचार्जवर 1 जीबी डेटा फ्री मिळणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More