जालना जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट – eNavakal
महाराष्ट्र शेती

जालना जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट

जालना -2012-13 प्रमाणे याही वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जालना जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे’ सावट पसरलेले आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे रिकामीच आहे. खरीप पिकाची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. जालना जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मोसंबी व कपाशी हे पीक घेतले जाते. कपाशीची खूप दैनी अवस्था झाली आहे. शेतकऱ्याने लावलेला उत्पादन खर्च सुद्धा निघणे शक्य नाही. सोयाबीन मूग तर शेतकऱ्याला बिगर काढण्याचे नांगर घालावा लागला. कपाशीचे तेच  झाले आहे. एकरी एक ते दोन क्विंटल कापूस शेतकऱ्याला होणार आहे, हवामान खात्याने  अतिपावसाचा अंदाज देऊन सुद्धा एकही थेंब पाऊस पडला नाही त्यामुळे खरीप तर हातचे गेलेलेच आहेत पण रब्बीची पेरणी सुद्धा होणारे नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी जूनपासूनच जालना जिल्ह्यात खूपच पाऊस कमी आहे. परतीच्या पावसावर  सर्व शेतकऱ्यांना खूप आशा होती. पण थोडाही पाऊस झाला नाही. खरीप रब्बी या दोन्ही पिक हातातून गेले आहेत. आता जनावराच्या व माणसाच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आतापासून खूपच बिकट होणार आहे. अजून किमान आठ ते नऊ महिने पाऊस पडणार नाही असे दिसते. जर असे झाले तर जालना जिल्ह्यावर लातूरसारखी रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येणार आहे. शेतकऱ्याकडे जनावरे आहेत हेसुद्धा त्याला विकण्याची वेळ पुढील काळात शेतकऱ्यावरती येणार आहे. अगोदरच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी यावर्षीच्या दुष्काळामुळे  कोलमडून जाणार आहे.
भाजपा सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे कर्जमाफी योजना काढली व शेतकऱ्यांना तत्व शहा कर्जमाफी दिली. पण आजपर्यंत कित्येक शेतकऱ्यापर्यंत  पोहोचलीच नाही. शेतकऱ्याचे नाव कर्जमाफीच्या यादीत आहे की नाही हेसुद्धा शेतकऱ्याला कळण्याचा मार्ग समजत नाही. बँकेत विचारणा केली असता यादीत नाव नाही असे उडवाउडवीचे उत्तर शासन दरबारी मिळतात. जरी यादीत नाव असले तरी कित्येक बँकेकडून कर्ज वाटप केलेले नाही. पीक कर्ज हे जास्तीत जास्त पंधरा ऑगस्टपर्यंत वाटणे गरजेचे असते. शेतकऱ्याला हे पैसे पीक उत्पादन खर्च म्हणून लागतात पण आता ऑक्टोबर सुरू झाला आहे तरीसुद्धा कित्येक बँकेचे 50% सुद्धा वाटप अजून झालेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा जास्तीचा अडचणीत आलेला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More