औरंगाबाद – नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसात जायकवाडी धरणात जवळपास 65 टीएमसी पाणी दाखल झाले. त्यामुळे या धरणात आज बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 58 टक्के जिवंत पाणी साठा झाला आहे. जायकवाडी धरणाची 102 टीएमसी साठवणूक क्षमता असून नाशिकमधील मुसळधार पावसामुळे यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. तरीदेखील मराठवाडा अजून तहानलेलाच आहे. अजून येथील इतर धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा न झाल्यामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. आजही मराठवाड्यातील अनेक धरणात शुन्य पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी – 57.78, लोअर दुधना – उणे 19.32, येलदारी – उणे 2.75, सिद्धेश्वर – उणे 63.49, माजलगाव – उणे 25.19, मांजरा – उणे 22.88, इसापूर – 9.72, लोअर मनार – 12.19, लोअर तेरणा – उणे 17.07, विष्णुपुरी – 00.00सीना कोळेगाव – उणे 87.48 शहागड, वेअर – 00.00, खडका वेअर – 6.02 कमी पर्जन्यमानामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
