जात पंचायतीने कुटुंबालाच वाळीत टाकले! – eNavakal
News महाराष्ट्र

जात पंचायतीने कुटुंबालाच वाळीत टाकले!

लातूर – जात पंचायतीने 50 हजारांची मागणी पुढे करीत एका कुटुंबालाच वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निलंगा येथील भिल्ल वस्तीत घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे.
गोविंद व्यंकट गांगुर्डे यांचा भाऊ सुरेश याचा विवाह लक्ष्मण गंगाराम विभुते यांच्या मुलीशी 2007 साली विवाह झाला होता. त्यांना पाच अपत्ये आहेत. मात्र त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो दारू पीत असल्यामुळे आमची बदनामी होत आहे. त्यामुळे मुलीशी त्याने घटस्फोट घ्यावा, असा निर्णय लक्ष्मण विभुते यांनी घेतला. त्यासाठी त्याने जात पंचायतीची
बैठक बोलावली.
तीन दिवसांपूर्वीच लक्ष्मण विभुते यांनी गोविंद यांना त्यांच्या मुलीची अपत्य आणून दे व पन्नास हजार रुपये दे, अशी मागणी केली. एवढी रक्कम देण्यास गोविंदने असमर्थता दर्शवल्याने जातपंचायत बसवून गोविंद व त्यांच्या पत्नीस जात बहिष्कृत करण्यात आले. त्यांच्या पत्नीशी अश्लील वर्तन करण्यात आल्याचे गोविंद यांनी सांगितले. दरम्यान ही बाब जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने घेतलेली आहे. तसेच संबंधितांवर कारवाईचे अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश

अरुणाचल-सिक्कीम विधानसभा निवडणूक! भाजपकडून 18 उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीतील 18 उमेदवारांची नावे आज भाजपने जाहीर केली. यामध्ये सिक्कीमच्या 12 तर अरुणाचल प्रदेशच्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

औरंगाबादमधील तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमधील कागजीपुरा आज दुपारी घटना घडली. नसीम खान मुबीन...
Read More
post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More