जाणून घ्या! ‘मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब’ची आजवरची कारकीर्द – eNavakal
ट्रेंडिंग

जाणून घ्या! ‘मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब’ची आजवरची कारकीर्द

युनियन ऑफ युरोप असोसिएशनने (युईएफए) इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेच्या विजेत्या मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. युईएफएच्या आर्थिक नियंत्रण समितीने मँचेस्टर सिटी संघाने स्पॉन्सरशिपमधून मिळालेल्या निधीला चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळे दोन वर्ष या संघावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामूळे अनेक फुटबॉल प्रेमींना धक्का बसला आहे. मँचेस्टर सिटी क्लबविषयी आपण माहिती घेऊ.

मँचेस्टर सिटी क्लबविषयी 

मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनाइटेड किंग्डमच्या मँचेस्टर शहरामधील एक व्यवसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब इंग्लडच्या प्रीमियर लीगमध्ये खेळतो. सुरवातीला १८८० साली सेंट मार्क्स या नावाने या क्लबची स्थापन झाली होती. त्यानंतर १८८७ साली अर्डविक असोसिएशन फुटबॉल क्लब आणि १८९४ सालापासून मँचेस्टर सिटी क्लब म्हणून ओळखला जाऊ लागला. मँचेस्टर सिटीने पहिल्यांदा १८९९ साली फुटबॉल लीगमध्ये सहभाग घेतला होता. तसेच सर्वात पहिला प्रतिष्टीत असा ‘फुटबॉल असोसिएशन चॅलेंज कप’ १९०४ साली जिंकला होता.  १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात व १९७०च्या सुरुवातीला या क्लबने यशस्वी कामगिरी केली होती. मात्र १९८१ साली ‘फुटबॉल असोसिएशन चॅलेंज कप’ हातातून गमावल्यानंतर क्लबची अधोगती झाली. त्यानंतर २००१ सालापासून आपली प्रगती करत क्लब पुन्हा मुख्य प्रवाहात आला.

२००८ साली हा क्लब अबु धाबीमधील युनाइटेड ग्रुपने विकत घेतला व दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. त्यानंतर मँचेस्टर सिटीची वाटचाल प्रीमियर लीगमधील सर्वोत्तम स्थानाकडे सुरू झाली.

क्लबने सहा डोमेस्टिक लीग विजेतेपद जिंकले आहे. यासह २०१८ सालच्या प्रीमियर लीगमध्ये फुटबॉल प्रशिक्षक पेप गार्डीओलाच्या नेतृत्वाखाली एका मौसमात १०० गुणसंख्या मिळवणारा एकमेव प्रीमियर लीग संघ ठरला.

२०१८-१९ साली ५६८.५ मिलियन इतके महसूल असणारा मँचेस्टर सिटी क्लब हा जगातील पाचव्या स्थानावर होता. प्रसिद्ध अशा फोर्ब्स मासिकाने हा अहवाल दिला होता.

यासह क्लबच्या खेळाडूंच्या जर्सीचा रंग आकाशी ठेवण्यात आला आहे. यापूर्वी जर्सीच्या रंगाबाबत निश्चितता नव्हती. मात्र १८९२ सालापासूनच्या पुराव्यानुसार क्लबच्या सदस्यांच्या जर्सीचा रंग हा आकाशी करण्यास आला.

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More