जाणून घ्या! प्रसिद्ध गिटारवादक सोनम शेरपाचा आजवरचा प्रवास – eNavakal
ट्रेंडिंग मनोरंजन

जाणून घ्या! प्रसिद्ध गिटारवादक सोनम शेरपाचा आजवरचा प्रवास

इंडियन रॉक बँड ‘परिक्रमा’चा प्रमुख गिटारवादक सोनम शेरपा याचे १४ फेब्रुवारीला वयाच्या ४८व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा हा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि अनेक संगीतप्रेमींना एकच धक्काच बसला. प्रसिद्ध गिटार वादकाचा असा अकाली झालेला मृत्यू हा त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होताच. शिवाय बॉलिवडूमधील काही कलाकारांनीही यावर शोक व्यक्त केला आहे. संगीतकार विशाल दादलानी, निर्माता, अभिनेता, गायक फरहान अख्तर आदींनी शेरपाच्या जाण्यावर दुःख व्यक्त केलं आहे. प्रसिद्ध रॉक बँडची सुरुवात करणारा सोनम शेरपाविषयी आपण आज जाणून घेऊ.

सोनम शेरपाचा अल्प परिचय 

सोनम शेरपा याचा जन्म ८ ऑक्टोबर १९७१ साली पश्चिम बंगालच्या कालिम्पोंग येथे झाला. कालिम्पोंग  येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर सोनम पदवीच्या अभ्यासासाठी दिल्लीत आला होता. दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी मल कॉलेजमध्ये सोनमने बी. कॉमचं शिक्षण घेतलं. वयाच्या ९व्या वर्षापासूनच सोनमने गिटार वाजवण्यास सुरवात केली होती. संगीत क्षेत्रातील आपली आवड जपत सोनम आपल्या शिक्षणानंतर एका रॉक बँडमध्ये दाखल झाला. दिल्लीत ‘म्रिग्या’ या बँडचा तो सदस्य बनला.

आपल्या संगीत क्षेत्रातील वाटचालीत सोनमने १९९१ साली ‘परिक्रमा’ या रॉक बँडची स्थापना केली. यावेळी बँडची सुरुवात करण्यास सोनमला सुबीर मलिक, प्रशांत बहादूर, चिंतन कारा, राहुल मल्होत्रा आदींचा साथ लाभली.

बँडच्या सुरुवातीपासूनच सोनमने लीड गिटार वादक म्हणूनच नेहमी सादरीकरण केलं. आपल्या संगीताच्या जादूने तो नेहमीच चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असे.

रॉक बँडच्या सादरीकरणासह सोनमने बॉलिवूडमध्येही आपले करिअर आजमावण्याचा प्रयत्न केला. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मंजुनाथ’ या चित्रपाटासाठी सोनमने स्वतःच संगीत देऊ केलं होतं.

रोलिंग स्टोन्स मॅगझीनने जाहीर केलेल्या टॉप १० गिटार वादकांच्या यादीत सोनम शेरपाचं नाव झळकलं होते.

सोनम याची संगीत क्षेत्रातील कारकीर्द ही अशीच पुढे सुरु होती. मात्र वयाच्या ४८व्या वर्षीच त्याच हा प्रवास थांबला. अखेरच्या क्षणीही सोनम आगामी चित्रपटाचे संगीत रेकॉर्ड करत होता.

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More