जाणून घ्या! ‘इनक्लूशन’ बँड मागची मोहीम काय? – eNavakal
ट्रेंडिंग

जाणून घ्या! ‘इनक्लूशन’ बँड मागची मोहीम काय?

सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे सामाजिक विषयांशी निगडित उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेताना आपण पाहिले आहे. सामाजिक हिताच्या आणि ऐक्याच्या मुद्द्यांवर बॉलिवूडकर नेहमी सरसावताना दिसले आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीने  काहीदिवसांपूर्वी अशाच एका मुद्द्याशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ज्यामध्ये तिने ‘इनक्लूशन’ असं लिहलेला बँड परिधान करून सर्वांनी एकत्र येत याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. केवळ सोनाक्षीच नव्हे तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हे बँड हातात घालत या मोहिमेला पाठिंबा दर्शवला होता. अनेकांना ही मोहीम नेमकी का आणि कशासाठी आहे हे माहित नसून त्याविषयी आपण आज माहिती घेऊ.

‘इनक्लूशन’ बँड नेमकी मोहीम काय? 

मुंबई स्थित ‘Jai Vakeel’ ही सामाजिक संस्था बौद्धिकदृष्ट्या अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारते. समाजात त्यांनाही सामान स्थान, सन्मान मिळावा याकरता संस्थेने #choosetoinclude ही मोहीम सुरू केली. यासह संस्थेने अनेक वस्तूंचा पुनर्वापर करून तयार केलेले ‘इनक्लूशन’ बँड हे या मोहिमेचाच एक भाग आहे. या बँडच्या माध्यमातून येणारा निधी हा संस्थेतील मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी उपयोगात आणला जातो. गेल्यावर्षी जागतिक अपंगत्व दिनानिमित्त बॉलिवूड सेलिब्रिटींनी पुढाकार घेत या मोहिमेला पाठिंबा दिला. संस्थेकडून विक्री केल्या जाणाऱ्या इनक्लूशन बँडची खरेदी करून सेलिब्रिटींनी समानात आणि सर्वसमावेशकता असा संदेश यातून दिला.

‘Jai Vakeel’ संस्थेची सुरुवात 

जय आणि हॉर्मुसजी वकिल या दाम्पत्याने १९४४ साली या संस्थेची स्थापना केली. डाऊन सिंड्रोम हा आजार असलेल्या आपल्या मुलीला घेऊन प्रथम त्यांनी संस्थेची सुरुवात केली. बौद्धिकदृष्ट्या अक्षम व अपंग असलेल्या विशेष मुलांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं करण्यास ही संस्था मदत करते. संस्थेचे उद्धिष्ट असे की, विशेष मुलांना त्यांच्या जास्तीत जास्त क्षमतेचे प्रशिक्षण देणे जेणेकरून एक दिवस प्रत्येक विशेष मूल कुटुंबातील सदस्य आणि भारताचा जबाबदार नागरिक होईल. मुंबईतील शिवडी या भागात ही संस्था स्थित असून थेरपी, रिसर्च सेंटर, बोर्डिंग आदी विभागांचा यात समावेश आहे. तर नाशिक आणि पुण्यातही संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. जनजागृती निर्माण करण्यासह ही संस्था मुलांना स्वयंपूर्ण देखील बनवण्यास मदत करते.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

गर्दी टाळण्यासाठी कल्याण डोंबिवलीत गणपती विसर्जनासाठी ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

डोंबिवली – कोरोनाच्या संसर्गामुळे गणेशोत्‍सव सध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने कंबर कसली आहे. विसर्जना...
Read More
post-image
देश

हिमाचलमध्ये डिसेंबर-जानेवारीत होणार पंचायत राज निवडणुका

शिमला- हिमाचल प्रदेशात पंचायत राज संस्थांच्या निवडणुका डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होतील, अशी माहिती ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री वीरेंद्र कंवर यांनी दिली. कंवर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

श्रीनगरमध्ये पोलिसांच्या शोधमोहीमेत स्फोटकांसह शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर – जम्मूच्या श्रीनगर येथे जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने राबवलेल्या शोधमोहिमेत शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली असल्याची माहिती...
Read More
post-image
देश

दिल्ली मेट्रोच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्क्यांची कपात

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या दिल्ली मेट्रोने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑगस्टपासून मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

ही वेळ का आली याचं सरकारने आत्मपरीक्षण करावं, नारायण राणेंचा सल्ला

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवलं आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, भाजपचे नेते नारायण राणे यांनीही ठाकरे...
Read More