जागा वाटपावरुन कॉंग्रेस-पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये जुंपली  – eNavakal
देश निवडणूक

जागा वाटपावरुन कॉंग्रेस-पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये जुंपली 

अहमदाबाद- गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये रविवारी रात्री तूफान राडा झाला. काँग्रेसने रविवारी रात्री ७७ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने पाटीदार समितीचे कार्यकर्ते नाराज असून सुरतमधील काँग्रेस कार्यालयात काम होऊ देणार नाही, असा इशाराच पाटीदार समितीने दिला आहे.

सुरतमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असलेल्या वरच्चा रोड या मतदारसंघातून काँग्रेसने प्रफुल्ल तोगडिया यांना उमेदवारी दिली. रात्री उशिरा पाटीदार आंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रफुल्ल तोगडिया यांच्या कार्यालयाबाहेर जमले. काँग्रेस कार्यकर्ते आणि पाटीदार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. तिकीट वाटप करताना पाटीदार समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. आम्हाला विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली, असा आरोप भंभानिया यांनी केला. काँग्रेसने कोअर कमिटीला विश्वासात न घेतला पाटीदार सदस्यांच्या तिकीटाची घोषणा केली आहे. आम्ही काँग्रेस कार्यालयांवर हल्ला करत आपला विरोध व्यक्त करणार असल्याचे हार्दिक पटेलचे निकटवर्तीय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर पाटीदार अनामत आंदोलन समितीतर्फे काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेले दिनेश बंभानिया म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More