जागतिक मलेरिया दिन, जाणून घ्या कसे पळवायचं घरातील मच्छरांना – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य देश

जागतिक मलेरिया दिन, जाणून घ्या कसे पळवायचं घरातील मच्छरांना

मुंबई -दिवसेंदिवस वाढणा‍‍र्‍या शहरीकरणामुळे सार्वजनिक अस्वच्छतेचे प्रमाण देखील वाढले आहे. परिणामी डासांची उत्त्पती वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे. मग डासांना दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली केमिकलयुक्त उत्पादन वापरल्यास त्याचा उलट परिणाम मानवी शरिरावरच होतो. मग डासांना तुमच्यापासून दूर करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय नक्की करून पहा.

निलगिरी व लिंबाचे तेल

निलगिरी व लिंबाच्या मिश्रण लावणे अधिक  चांगले. यामुळे शरिरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. निलगिरी व लिंबाचे तेल समप्रमाणात घेऊन शरिराला लावल्यास डासांपासून रक्षण होते.

 तुळस

घराजवळ तुळशीचे रोपटे लावणे हितकारक आहे.  यामुळे डासांची उत्त्पती कमी  होते व त्यांचा घरातील प्रवेश रोखला जातो.

 लसूण

लसुणाच्या उग्र वासामुळेच डास तुमच्यापासुन व तुमच्या घरापासून दूर  राहतात. लसणाच्या काही पाकळ्या ठेचून ,पाण्यात  उकळून घ्या. हे पाणी तुम्ही तुमच्या घराजवळ फवारा. यामुळे तुमचे डासांपासुन रक्षण  होईल.

पुदिना

पुदिन्याचा अर्क व पुदिन्याचे तेल तुमचे डासांपासून  निश्चितच  रक्षण करू शकेल. याकरिता तुम्ही पुदिन्याचे रोपटे घरजवळ किंवा खिडकीत लावू  शकता ,त्याचे तेल अंगाला लावू शकता. याच बरोबर तुम्ही पुदिन्याच्या वासाचे माऊथवॉश पाण्यासोबत मिसळून ते घराजवळ फवारू  शकता.

कापूर

कापूर जाळल्यामुळे त्याच्या सुगंध आणि धुरामुळे दुषित वायू दूर होतो. कापूर वापरून मच्छर दूर पळवता येतात. मच्छर पळवण्यासाठी एका भांड्यात पाणी भरून त्यामध्ये कापूर टाकून घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. यानंतर काही वेळातच याच्या धुरामुळे मच्छर दूर पळतील. हा उपाय दररोज केल्याने मच्छरा पासून सुटका मिळू शकते.

कडूलिंबाच्या पानांचा धूर

कडुलिंबाची पाने जाळल्याने निर्माण होणारा धूर मच्छर दूर पळवतो.

पाणी जमा होऊ देऊ नका

घरातील कोणत्याही भागात पाणी जमा होऊ देऊ नका. पाणी जमा झाल्याने त्यामध्ये मच्छर आपली पैदास करतात. यामुळे जर घरात पक्ष्यांना ठेवलेले पाणी असो किंवा कुलरचे पाणी याकडे लक्ष ठेवा आणि पाणी बिल्कुल जमा होऊ देऊ नका.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More