जसलोकमध्ये कोरोनाचा प्रवेश! 5 नर्स, 12 कर्मचारी पॉझिटिव्ह – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

जसलोकमध्ये कोरोनाचा प्रवेश! 5 नर्स, 12 कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यातील आणि खास करून मुंबईतील रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. असे असतानाच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध जसलोक रुग्णालयात आता कोरोनाने प्रवेश केला आहे. येथील 5 नर्स आणि 12 कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

संसर्ग झालेल्यांत 5 नर्स एक स्वयंपाकी, तंत्रज्ञ आणि मदतनीस यांचा समावेश आहे. त्यामुळे येथील तब्बल 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तिचा अहवाल बाकी असून, या प्रकारानंतर संपूर्ण हॉस्पिटल आता सील करण्यात आले आहे. जसलोकमध्ये उपचार घेणारा तरुण सध्या पूर्णपणे बरा झाला आहे. मात्र येथील कर्मचारी कोरोना पॉझिटिव आल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या हा तरुण 6 मार्च रोजी अमेरिकेतून मुंबईत आला होता. त्याला सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला जसलोकमध्ये हालवण्यात आले. त्यानंतर 31 मार्च रोजी त्याला पूर्ण बरा झाल्यावर घरी पाठवण्यात आले. मात्र त्याच्या संपर्कात आल्याने येथील अ नेक कर्मचाऱ्यांना मात्र आता कोरोना संसर्ग झाला आहे. दरम्यान, येथे उपचार घेतलेल्या या तरुणाची पत्नी आणि मुलालाही कोरोना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More