जळगाव महानगरपालिका निवडणुकीत 75 जागांसाठी 303 उमेदवार! – eNavakal
News महाराष्ट्र

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत 75 जागांसाठी 303 उमेदवार!

जळगाव – जळगाव महापालिका निवडणुकीचे अंतिम चित्र माघारीअंती स्पष्ट झाले आहे. 75 नगरसेवक निवडून देणार्‍या या निवडणुकीत 82 अपक्षांसह एकूण 303 उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यात भाजपने सर्वच्या सर्व 75 उमेदवार दिले असून शिवसेनेने 68 अधिकृत तर 7 उमेदवार पुरस्कृत केलेले आहेत. राष्ट्रवादीने 42 तर काँग्रेसचे 16 उमेदवार या निवडणुकीत लढणार आहेत.

महापालिका निवडणुकीचा महत्त्वाचा माघारीच्या टप्पा पार पडला. एकूण 427 वैध अर्जांपैकी माघारीच्या अखेरच्या दिवशी 124 उमेदवार मागे हटले असल्याने अंतिम 303 उमेदवार रिंगणात उरले आहेत. शहरातील एकूण 19 प्रभागांपैकी बहुतांश प्रभागात तिरंगी लढती रंगणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाची आघाडी झाल्याने सपाचे 6 उमेदवार लढणार आहेत. त्याच बरोबर एमआयएमचे 6, कम्युनिस्ट 2, हिंदू महासभा 2 आणि बीआरएसपीचे दोन उमेदवारही ही निवडणूक लढत आहेत.

जळगाव महापालिकेच्या मागील निवडणुका भाजपने एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात लढल्या होत्या. 2013 च्या निवडणुकीत भाजपने 15 जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र भाजपची सर्व सूत्रे गिरीश महाजन यांच्याकडे असून त्यांनी स्वबळावर 50 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राष्ट्रवादीचे गेल्या वेळी 11 नगरसेवक निवडून आले होते, यावेळी त्यातील बरेच पक्ष सोडून भाजप किंवा शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाचीच यावेळी परीक्षा आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 कडे शहराचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे (जैन गट)विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा हे तिनं माजी महापौर व शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या पत्नी ज्योती तायडे लढणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये – जयश्री खाडिलकर-पांडे

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा सुप्रीम कोर्टाकडून मंजूर

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा माफीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच राहुल गांधी यांनी भविष्यात कोणतीही टिप्पणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
विदेश

व्हेनिसला महापुराचा तडाखा; पर्यटकांचे हाल

वेनिस – जगातील सुंदर शहर अशी ओळख असलेल्या व्हेनिस शहराला महापुराने विळखा घातला आहे. इटलीतील या शहराचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील जनजीवन...
Read More