जळगाव जिल्हा बँकेची पीक विमा योजनेत 12 कोटींची फसवणूक – eNavakal
News गुन्हे महाराष्ट्र

जळगाव जिल्हा बँकेची पीक विमा योजनेत 12 कोटींची फसवणूक

जळगाव -जिल्हा सहकारी बँकेची पीक विमा योजनेत 12 कोटी 45 लाख 18 हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे सरव्यवस्थापकांनी ओरिएंटल कंपनीच्या उप सर व्यवस्थापकासह सहा जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सदर रक्कम कंपनीकडे भरल्याचे सर्व पुरावे सादर केले आहेत .

जिल्हा सहकारी बँकेच्या पीक विमा रक्कम 12 कोटी 45 लाख रुपयांचे प्रकरण सध्या गाजत आहे. या रकमेचे गौडबंगाल नेमके काय यासंदर्भात चर्चेचे गुर्‍हाड सुरू असतांनाच बँकेकडून ओरिएंटल विमा कंपनीवर फसवणूक तसेच दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सध्यातरी चर्चांना विराम बसला आहे.

जळगाव जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील 72 हजार 554 शेतकर्‍यांच्या पीक विम्याच्या प्रीमियम पोटी 12 कोटी 95 लाख 36 हजार रुपये 18 ऑगस्ट 2017 आणि 1 सप्टेंबर 2017 रोजी जमा केले होते. जिल्हा बँकेने कंपनीच्या नावे 12 कोटी 45 लाख 18 हजार रुपये आरटीजिएस प्रणालीद्वारे पाठविले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांची यादी पोर्टलवर भरताना अनंत अडचणी निर्माण झाल्या होत्या व त्यासंदर्भात बँकेच्या अधिकार्‍यांनी ओरिएंटलच्या सर्व अधिकार्‍यांना फोनद्वारे कळविले होते तथापि त्या अडचणी सोडविण्यासाठी कंपनीकडून कोणतीच कार्यवाही केली गेली नसल्याचे बँकेचे कार्यकारी संचालक देशमुख यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

इव्हीएम मशीनवर बंदीसाठी सोलापुरात धरणे आंदोलन

सोलापूर- देशामध्ये इव्हीएम मशीनवर बंदी घालावी या व इतर मागण्यांसाठी आज रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बबन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

गॅलरीतून डोकावणार्‍या मुलीचा तिसर्‍या मजल्यावरून पडून मृत्यू

भिवंडी- शहराच्या मुस्लीम वस्तीच्या इस्लामपुरा परिसरातील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या गॅलरीतून डोकावणार्‍या आठ वर्षीय मुलीचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटनेत राडा

औरंगाबाद- वसतीगृहाच्या मुद्यावरून कुलगुरूंच्या केबिनमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू मांडल्याने अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटना आपापसात भिडल्याची घटना घडली. याप्रकरणी उद्या दलित विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उसाचे बिल न दिल्याच्या कारणावरून प्रहारचे आंदोलन

सोलापूर- एफआरपीची रक्कम मिळावी आणि मागील वर्षाचे उसाचे बिल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिकात्मक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

12 हजार ग्राहकांचा पुरवठा आठ तास खंडित

वसई –  महावितरणच्या वसई उपविभागांतर्गत येणार्‍या सातीवली गावातील 22 केव्ही ट्रान्सफॉर्मरच्या यंत्रणेशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्यामुळे 12 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा चार दिवसांपूर्वी बाधित होऊन...
Read More