जळगाव – जगभरातील १९० देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतात दहशत निर्माण केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तसेच घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका अशा सूचना राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. तरीही अनेक ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. आज सकाळपासून जळगावात भाजी लिलावासाठी तुडुंब गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे जळगावकरांचा बेजबाबदारपणा समोर आलाच आहे, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गर्दीत एकजरी कोरोनाबाधित असेल तर मोठा हाहाकार उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
