जळगावात पपईने भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात; १५ मजूर ठार, २ जखमी – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जळगावात पपईने भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात; १५ मजूर ठार, २ जखमी

जळगाव – जिल्ह्यातील यावल तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने यावल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 10 सदस्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावलजवळ असलेल्या किनगाव येथे साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे चालला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांवर मजूर बसले होते. ट्रक उलटल्यामुळे हे मजूर पपईच्या ढिगाऱ्याखाली सापडले असल्याचे कळते आहे. सर्व मजूर हे झोपलेले असल्याने काही कळण्याच्या आत काळाने त्यांच्यावर झडप घातली. या भीषण अपघातात 15 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघाताबाबत माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींवर सध्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जळगावात पपईने भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात; १५ मजूर ठार, २ जखमी

जळगाव – जिल्ह्यातील यावल तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने यावल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त अमृता फडणवीस यांचं खास गाणं

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त एक खास गाणं सादर केलं आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

पुणे – राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 16 ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसांत राज्यातील विविध...
Read More
post-image
महाराष्ट्र

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोलीमध्ये शांततेत मतदान

नागपूर – गडचिरोली जिल्ह्यातील सन २०२१ ची ग्रामपंचायत निवडणूक मतप्रक्रिया १२ तालुक्यामध्ये दोन टप्यात ९२० मतदान केंद्रावर घेण्यात आली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

नागपूर –  शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात २०२२...
Read More