जळगावला पाणीटंचाईचे संकट; वाघूर धरणात 35 टक्के साठा – eNavakal
जीवनावश्यक महाराष्ट्र

जळगावला पाणीटंचाईचे संकट; वाघूर धरणात 35 टक्के साठा

जळगाव – अर्धा पावसाळा संपला असतांना जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने आजही 38 गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच साडेपाच लाखांवर लोकसंख्येच्या जळगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघूर धरणातही फक्त 35 टक्केच पाणी साठा असल्याने आगामी काळात जळगाव शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. वाघूर नदीच्या उगम क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यास धरणाच्या साठ्यात वाढ होणार असून पुढील जलसंकट टळणार असल्याने पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे पावसाळ्याचे दोन महिने झाले तरीही जिल्ह्यात अवघा 38 टक्केच पाऊस झाल्याने पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात आजही 38 गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून शंभरावर गावे अधिग्रहित केलेल्या विहिरीतून आपली तहान भागवित आहेत. जळगाव शहरात आज पाण्याची स्थिती उत्तम म्हटली जात असली तरीही वाघूर धरणातील आजचा पाणीसाठा पाहता पुढील काळात (उन्हाळ्यात) जळगाव शहरालासुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. वाघूर नदीच्या उगम क्षेत्र (अजिंठा डोंगर)भागात दमदार पाऊस नसल्याने नदीला पूर आलेला नाही. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. आणखी पावसाळ्याचे दोन महिने बाकी असून या काळात दमदार पाऊस होऊन पावसाने सरासरी पूर्ण केल्यास परिस्थितीत बदल होऊ शकतो आणि तो होणारच असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कमलनाथ की ज्योतिरादित्य? गेहलोत की सचिन पायलट? अनुभवी की युवा?

जयपूर – राजस्थानात काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याने आजच सायंकाळी 7 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला. मात्र निवडणूक निकाल...
Read More
post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More