जळगावमध्ये युतीची समीकरणे अद्याप अस्पष्ट – eNavakal
News आघाडीच्या बातम्या निवडणूक

जळगावमध्ये युतीची समीकरणे अद्याप अस्पष्ट

जळगाव – जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 1 ऑगस्ट रोजी जाहीर झाली आहे. मपाच्या निवडणुकीत परस्परविरोधी लढणारे खान्देश विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाची युतीदेखील जाहीर झाली आहे. जळगाव भाजपातील एक गट यंदाची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि खान्देश विकास आघाडीचे सर्वेसर्वा सुरेश जैन यांनी हातमिळवणी करीत युतीतर्फे ही निवडणूक लढण्याचे निश्चित
केले आहे.
महापालिकेत नगरसेवकपदाच्या एकूण 75 जागा असून 47 जागांवर विकास आघाडी तर 28 जागांवर भाजपा लढणार आहे. त्यातच मागील निवडणुकीत विजयी मनसेचे विद्यमान 12 नगरसेवक महापौर ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली खान्देश विकास आघाडीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे खान्देश विकास आघाडीपुढे जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जळगावमध्ये अद्याप तरी युतीची समीकरणे स्पष्ट झालेली दिसत नाही.
उद्या 4 जुलैपासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होत आहे. भाजपाला सध्या मिळत असलेल्या 28 जागांच्या व्यतिरिक्त जागांवरील भाजपाचे इच्छुक उमेदवार तिकीटाच्या आशेखातर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगावमध्ये काँग्रेसचे फारसे प्राबल्य नाही.
अद्याप त्यांना नगरसेवकपदाचे खाते उघडायचे आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 11 जागांवर आपले नगरसेवक निवडून आणले होते. या निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा एक नगरसवेक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खान्देश आघाडीत दाखल झाला आहे. त्यामुळे पक्षाची पत राखण्यासाठी भाजपाच्या बंडखोरांना पाठीशी घालण्याचा राष्ट्रवादी नक्की प्रयत्न करणार आहे. माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची प्रतिष्ठादेखील या निवडणुकीत पणाला लागली आहे.
जळगावमध्ये राजकीय वजन असलेले भाजपाचे नेते एकनाथ खडसे हे जरी जाहीरपणे गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याची वार्ता करती असले तरी त्यांचे कट्टर समर्थक येणार्‍या काळात निवडणूक प्रचारात कशाप्रकारे योगदान देतात हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. अद्यापतरी जळगाव पालिका क्षेत्रात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला नसला तरी या आठवड्याच्या अखेरीस रणधुमाळीला सुरुवात होईल, अशी चर्चा सर्वसामान्य जळगावकरांमध्ये सुरू झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी

मुंबई – ठाण्याच्या सुप्रसिद्ध विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये धक्कादायक संदेश मिळाला आहे. या बाथरूममध्ये संदेश ठेऊन मुंबईतील लोकप्रिय धार्मिक स्थळ सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

उन्हाळ्याची सुट्टी संपली! आज शाळेचा पहिला दिवस

मुंबई – उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी आज शाळेत जाण्यास सज्ज झाले आहेत. विदर्भ वगळता आज १७ जूनपासून राज्यभरातील शाळांमध्ये पहिला तास भरणार आहे. नवा...
Read More