जळगावमध्ये कारचा भीषण अपघात ! ४ तरुणांचा जागीच मृत्यू – eNavakal
News अपघात महाराष्ट्र

जळगावमध्ये कारचा भीषण अपघात ! ४ तरुणांचा जागीच मृत्यू

जळगाव – जळगाव – भुसावळ या महामार्गावर काल मध्यरात्रीनंतर दोन कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका गाडीतील चौघा तरुणांचा मृत्यू झाला तर दोन्ही कारमधील पाच जण जखमी झाले आहेत. रात्री सुमारे साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. मृत सर्व तरुण शहराच्या सुरेशदादा जैन नगरातील रहिवाशी आहेत.

मुंबई – नागपूरवरील भुसावळ रस्त्यावर नशिराबाद गावाजवळील वळणावर असलेल्या काझी पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भुसावळकडून येणारी क्रेटा वजलगावकडून भुसावळकडे जाणारी आय टेन या भरधाव गाड्या समोरासमोर धडकल्या. यात सुबोध मिलिंद नरवाडे (21), समुद्र- गुप्त ऊर्फ बंटी चंद्रगुप्त सुरवाडे (2), दीपक अशोक चव्हाण (22), आणि रोहित प्रकाश जमदाडे (20) या क्रेटा गाडीतील चौघांचा दुर्दैवी मृत्यतु झाला. तर याच गाडीतील त्यांचे सहकारी सचिन अशोक तायडे आणि शुभम विजय इंधवे हे जखमी  झाले आहेत. आय टेन गाडीतील प्रिन्स अग्रवाल, शेख फिरोज अली मूक्रम अली आणि शोएब शेख हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

निम्म्या कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर – महापालिकेकडून कावळा नाका येथे पाण्याच्या टाकीखालील पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम आज सोमवारी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा बंद...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आजपासून कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – कुलभषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सोमवार 18 फेब्रुवारी पासून जाहीर सुनावणी सुरू होणार आहे. द हेग...
Read More
post-image
संपादकीय

(संपादकीय) अरे…सांत्वनाचे सौजन्य तरी पाळा

देशाच्या एकजूटीचे बळ कितीतरी प्रचंड असू शकते. हे अभूतपूर्वरीतीने दिसून आले आहे. सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश अनेक राज्य, अनेक भाषा, धर्म, पंथ,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१८-०२-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०६-०१-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०१-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More