जळगावच्या दोन्ही जागा सांभाळणे भाजपला कठीणच; आता खडसेंना युती धर्माची झाली आठवण  – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

जळगावच्या दोन्ही जागा सांभाळणे भाजपला कठीणच; आता खडसेंना युती धर्माची झाली आठवण 

जळगाव – जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघात भाजपाचेच खासदार आहेत. गेल्या वेळी मोदी लाटेत दोघांनाही लाखोंचे मताधिक्य मिळाले होते, यावेळी मात्र जिल्ह्यातील चित्र वेगळेच असून एकतर भाजपच्या दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीवर प्रश्न चिन्ह आहे आणि दुसरे म्हणजे येथे त्यांना  शिवसेनेची मदत मिळणे अशक्य आहे. कारण दोन्ही मतदार संघात शिवसेनेने भाजपला कडक इशाराच दिलेला आहे. शिवसेनेची ही भूमिका पाहता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आता युती धर्माची आठवण झाली आहे. त्यांच्यामते येथे आपला धर्म न पाळल्यास त्याचे अन्य ठिकाणी पडसाद पडतील.

जळगाव आणि रावेर या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ए. टी. नाना पाटील आणि रक्षा खडसे हे भाजपचे खासदार आहेत. त्यात पाटील यांच्या दोन टर्म झालेल्या असून रक्षा खडसे मात्र 2014 मध्ये पहिल्यांदाच लोकसभेत गेल्या होत्या. आता यावेळीही विद्यमान खासदार म्हणून त्यांची नावे निश्चित असायला हवी होती, मात्र दोघांच्याही उमेदवारीवर आजतरी प्रश्नचिन्ह आहे. जळगावच्या ए.टी. पाटलांबद्दल पक्षांतर्गत प्रचंड नाराजीचा सूर आहे व त्यांची एक नको ती व्हिडीओ क्लिप जारी झाल्याने त्यांचे नाव मागे पडल्यासारखे आहे.

रावेरात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा या प्रतिनिधित्व करीत आहेत. गेल्यावेळी त्यांनी चार लाखांवर मताधिक्य घेत विजय संपादन केला होता. त्यामुळे त्यांची उमेदवारी यावेळीही निश्चित असायला हवी .मात्र चित्र तसे अजिबात नाही. पक्षातील एकनाथ खडसे यांची अवस्था सर्वश्रुत आहे. त्यांचे येनकेन प्रकारे खच्चीकरण करण्यात आले आहे.त्यातच मागे भाजपच्या निष्क्रिय खासदारात रक्षा खडसे यांचे नाव आघाडीवर दर्शविण्यात आले होते. जवळचे समजले जातात .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More