जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार! सरकारनेच दिली कबुली – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार! सरकारनेच दिली कबुली

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी सरसकट कर्जमाफी, चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरसह जलयुक्त शिवार योजनेसाठी लाखो कोटी रुपये दिल्याची फुशारकी मारत असतानाच राज्यातील जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. राज्याच्या जलसंधारण विभागाने आज या भ्रष्टाचाराची कबुली विधानपरिषदेत दिली.
पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार बाळासाहेब चौधरी यांनी केली होती. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त चौकशी करून या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे व तक्रारीत तथ्य असल्याचे कबुल केले होते. आज विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात या भ्रष्टाचाराची कबुली दिली.
या सर्व 1300 जलयुक्त शिवार प्रकरणांची खुली चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. या 1300 प्रकरणांची जिल्ह्याबाहेरच्या अधिकार्‍यांची नेमणूक केली असून विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. तांत्रिक अहवाल आल्यावरच या प्रकरणात एसीबी (अ‍ॅण्टी करप्शन ब्यरो) चौकशी करायची की नाही याचा निर्णय घेऊ, असे मंत्री तानाजी सावंत यांनी सांगताच विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला. चौकशीचा निर्णय झाला नसला तरी सरकारने जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईतील तीन वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

पेनांग- मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील...
Read More