जम्मू-काश्मीरचे नवे सीमांकन 7 मतदारसंघ वाढविणार – eNavakal
News देश

जम्मू-काश्मीरचे नवे सीमांकन 7 मतदारसंघ वाढविणार

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता रद्द केल्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये अनेक आमुलाग्र बदल केले जाणार आहेत. आता जम्मू आणि काश्मीर राज्यातील विधानसभा मतदारसंघाचे नव्याने सीमांकन (परिसीमन) होणार असून तेथील विधानसभेचे 7 मतदारसंघ वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे 107 विधानसभा मतदारसंघांची संख्या आता 114 होणार आहे. जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरला दिल्लीसारखे केंद्रशासित राज्य बनविण्यात आले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा कारभार पहाणार्‍या राज्यपालांना हलवून तेथे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे नायब राज्यपाल नेमला जाईल. तसेच मतदारसंघांचे सीमांकन
केले जाईल.
सध्या जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 107 जागा आहेत. त्या 114 होतील. सध्याच्या 107 पैकी 87 जागा जम्मू- काश्मीरच्या आहेत. तर 20 जागा पाकव्याप्त काश्मीरच्या आहेत. या 107 जागांमध्ये 4 जागा लडाखच्या सुद्धा आहेत. पाकव्याप्त काश्मीरच्या 20 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण हा भारताचा प्रदेश असला तरी पाकिस्तानने त्यावर कब्जा केलेला आहे.
काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात बसवून त्यांचे 7 जादा मतदारसंघ बनविले जातील. त्यामुळे भविष्यात सर्व हिंदू मतदारसंघात हिंदू आमदारांच्या ताकदीवर भाजपा जम्मू-काश्मिरात सत्ता स्थापू शकेल. जम्मूृ-काश्मीर विधानसभा नेहमीच भाजपाच्या ताब्यात राहील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत वाढले कोरोनाचे 4 हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचे घरही कोरोनाच्या विळख्यात

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 690 वर जाऊन पोहोचली आहे. तर एकट्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 450 झाली आहे. कालपर्यंत मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचे चार हॉटस्पॉट...
Read More
post-image
देश

बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी

तिरुअनंतपुरम – बलात्कार पीडितेला २४ आठ‌वड्यांचा गर्भ पाडण्याची परवानगी केरळमधील उच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली. एका १४ वर्षीय...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

लढा लवकर संपवूया, संशयितांनो पुढे या- अजित पवार

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. रोज तिप्पटीने बदलणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात भिती निर्माण करतेय. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा संपवायचा असेल तर संशयितांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More