जमशेदपूरचा एटीकेला दणका; आयएसएलमध्ये 1-0 ने मिळवला विजय – eNavakal
क्रीडा देश

जमशेदपूरचा एटीकेला दणका; आयएसएलमध्ये 1-0 ने मिळवला विजय

कोलकाता – हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात गतविजेत्या एटीकेची अधोगती कायम राहिली. येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर जमशेदपूर एफसीने एटीकेला एकमेव गोलने हरविले. 66व्या मिनिटाला त्रिंदादे गोन्साल्वीस याने पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरला. एटीकेसाठी दोन्ही सत्रांत संधी दवडवणे निराशाजनक ठरले. पुर्वार्धात जमशेदपूरचा गोल ऑफसाईड ठरूनही एटीकेला खेळ उंचावता आला नाही.

64व्या मिनिटाला एटीकेच्या मध्य फळीतील खेळाडू हितेश शर्मा याने त्रिंदादेला पाडले. त्यामुळे जमशेदपूरला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर त्रिंदादेने एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार याचा अंदाज चुकवित एकाग्रतेने लक्ष्य साधले. जमशेदपूरने 13 सामन्यांत पाचवा विजय मिळविला. चार बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. जमशेदपूरचे 19 गुण झाले. एटीकेला सहावा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व तीन बरोबरींसह त्यांना 12 गुणांवर समाधान मानावे लागले. 71व्या मिनिटाला एटीकेला चांगली संधी मिळाली होती. फ्री-किकवर डेव्हिड कॉटेरील याने खेळाडूंच्या भिंतीवरून मारलेला चेंडू मारला अचूकतेअभावी नेटमध्ये गेला नाही. 82व्या मिनिटाला कॉटेरीलने दिलेल्या चेंडूवर मार्टिन पॅटरसन याने केलेले हेडिंग चुकले.

दोन्ही संघांनी सुरुवात सावध केली. पहिल्या आठ मिनिटांत कोणताही संघ संधी निर्माण करू शकला नाही. त्यानंतर जमशेदपूरचे प्रयत्न सुरु झाले. 12व्या मिनिटाला त्रिंदादेने बॉक्सच्या बाहेरून मारलेला फटका थोडक्यात हुकला. १८व्या मिनिटाला जमशेदपूरला कॉर्नर मिळाला. त्यावर बिकाश जैरूने इझु अझुका याच्या दिशेने चेंडू मारला, पण अझुका हेडींगला अचूकतेची जोड देऊ शकला नाही. 25व्या मिनिटाला जेरी माहमिंगथांगा याने काही अंतरावरून फटका मारला, पण तो नेटवरून गेला.

एटीकेच्या पहिल्या बऱ्या प्रयत्नाची नोंद 28व्या मिनिटाला झाली. जयेश राणेने बॉक्सच्या बाहेरून चेंडू मारला. नेटच्या दिशेने फटका गेला तरी तो कमकुवत असल्यामुळे जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल सहज बचाव करू शकला. 30व्या मिनिटाला जमशेदपूरने आणखी एक प्रयत्न केला. बिकाशच्या पासवर अझुकाने मारलेला चेंडू थोडक्यात बाहेर गेला. 40व्या मिनिटाला कॉर्नरवर डेव्हिड कॉटेरीलने चेंडू मारल्यानंतर एटीकेच्या मार्टिन पॅटरसनने धुर्तपणे आगेकूच केली, पण अनुभवी सुब्रतने चोख बचाव केला.

45व्या मिनिटाला जमशेदपूरचा गोल ऑफसाईड ठरविण्यात आला. वेलिंग्टन प्रिओरीने मारलेला चेंडू एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार याने थोपविला, पण रिबाऊंडवर अझुकाने चेंडू नेटमध्ये मारला. त्याचवेळी ऑफसाईडचा इशारा झाला. रिप्लेमध्ये हा निर्णय अगदी गुंतागुंतीचा  होता असे दिसून आले, जे एटीकेच्या फायद्याचे ठरले. पुर्वार्धात गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
विदेश

कोरोनाची लस शोधणारच! बिल गेट्स यांचा निर्धार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसवर परिणाम करणारी लस विकसित करण्यासाठी मिलिंडा व बिल फाउंडेशन पूर्ण निधी देणार आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि...
Read More
post-image
देश

जयपूरमध्ये अतिउत्साही नागरिकांनी फटाके वाजवले! बंगल्याला भीषण आग

जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काल रात्री घरातील दिवे बंद करून मेणबत्त्या आणि पणत्या लावण्यास सांगितले होते. मात्र राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील वैशाली...
Read More
post-image
महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी कोरोना ठरतोय धोक्याची घंटा

मुंबई – राज्यात गेल्या 2 दिवसांत कोरोना संसर्गाच्या नवीन 113 रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 748 इतका झाला आहे. आतापर्यंत 56...
Read More