टोकीयो – जपानला जेबी वादळचा तडाखा बसला आहे. गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठा असलेले ‘जेबी’ वादळ जपानच्या पश्चिम किनार्यावर येऊन थडकल्याने जमीनी धसल्या आहेत. या वादळाने जपानला तडाखा दिला तेव्हा त्याचा वेग प्रतीताशी 216 किमी इतका होता. या वादळामुळे पाऊस, वेगवान वारे आणि भूस्खलन झाल्यामुळे 11 लोकांचे प्राण गेले आहेत तर 300 लोक जखमी जाले आहेत.
मंगळवारी ओसाका खाडी परिसरात एक ट्रक उलटला तर क्योटोमध्ये रेल्वेस्टेशनच्या छताचा काही भाग कोसळला. वादळाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या वादळामुळे शिकोकू बेटावर मंगळवारी दुपारी जमीन धसल्याची घटना घडली. त्यानंतर हे वादळ जपानमधलं सर्वांत मोठं बेट होन्शूकडे सरकलं. जपानला जेबी वादळचा तडाख्यामुळे दहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी तातडीची बैठक घेऊन लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, सुरक्षितेच्या अनुषंगाने विमानसेवा बंद करण्यात आली आसून, बोटी, टे्रनही बंद ठेवण्यात आले आहेत. ओसाकातल्या कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचले आहे. जपानचा ओसाकाचा जगप्रसिद्ध स्टुडिओही बंद ठेवण्यात आला आहे.