जपानला क्रोसाची धडक! एकाचा मृत्यू, ३४ जण जखमी – eNavakal
विदेश

जपानला क्रोसाची धडक! एकाचा मृत्यू, ३४ जण जखमी

टोकियो – जपानमध्ये क्रोसा चक्रीवादळाने हाहाकार माजवला असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पश्चिम जपानच्या समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी क्रोसा धडकले. या वादळात एका ८२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ३४ जण जखमी झाले आहेत. तसेच जवळपास ४.३ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

क्रोसा वादळामुळे टोकियोत ताशी १२६ किमी वेगाने वारे वाहत असून प्रशासनाकडून पूर आणि भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाऱ्याच्या वेगामुळे ८०० हून अधिक देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली असून जपानच्या पश्चिम भागात बुलेट सेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबई- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्ती कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत नियोजित 10 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र ती...
Read More
post-image
News विदेश

फ्लोरिडात गोळीबार! हल्लेखोराला कंठस्नान

फ्लोरिडा – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आज पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एका बंदुकधार्‍याने नौदलाच्या तळाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला....
Read More
post-image
News मुंबई

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा सुरेश काकाणींनी पदभार स्विकारला

मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य...
Read More
post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More