जत्रेची हौस जीवावर बेतली 17 वर्षीय तरुणीची जळून आत्महत्या – eNavakal
गुन्हे मुंबई

जत्रेची हौस जीवावर बेतली 17 वर्षीय तरुणीची जळून आत्महत्या

भिवंडी – जत्रेच्या हौसे खातर घरून निघालेल्या एका 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जत्रेत जाण्यासाठी टेम्पोत जागा मिळाली नसल्याने तिने राहत्या घरात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील जूनांदुर्खी गावात घडली आहे.शितल सदानंद पाटील (17)असे आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे नाव आहे. विशेष म्हणजे तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे.

संपूर्ण राज्याच्या ग्रामीण परिसरात गुढीपाडवा संपल्यावर गावा – गावात दरवर्षी जत्रा उत्सव भरवले जातात.असाच जत्रा उत्सव डहाणूच्या महालक्ष्मी देवीचा भरत असल्याने या जत्रेसाठी जूनांदुर्खी गावातील महिला मंडळ 2 एप्रिल रोजी दर्शनासाठी निघाले होते.त्यावेळी मृतक शितलला टेंपोत जागा नसल्याने तीला देवीच्या दर्शनासाठी व यात्रेत जाता आले नाही.यामुळे व्यथित होवून तिच्या मनावर विपरीत परिणाम झाल्याने तिने राहत्या घराच्या खोलीत कोंडून घेत 2 एप्रिल रोजीच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.त्यात ती 56 टक्के जळाली होती.जाळून घेतल्याची धक्कादायक घटना तिच्या घरच्यांना कळताच त्यांनी तिला जळालेल्या अवस्थेत तत्काळ उपचारासाठी प्रथम भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.मात्र तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात येऊन उपचार सुरु होते.मात्र तिची मृत्यूशी झुंज सुरु असतानाच रविवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली आहे.या घटनेने जूनांदुर्खी – टेंभवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आज सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी ४३.७०% मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More