जगबुडीच्या पाण्याची पातळी वाढली; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जगबुडीच्या पाण्याची पातळी वाढली; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी – कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस असल्याने सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गारील वाहतूक ठप्प झाली आहे. जगबुडी नदीच्या पुलावर पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. तसेच वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सायंकाळी ७ वाजल्यापासून पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोनही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पाणी वाढल्याने खेड मधल्या जगबुडी नदीच्या पुलावरून वाहतूक थांबवण्यात आली आहे. पर्यायी मार्ग नसल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय. पावसामुळे खराब झालेला रस्ता, हायवेचं सुरू असलेलं काम यामुळे हा रस्ता जीवघेणा झाला आहे. त्यातच आता वाहतूक थांबविण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

322 पीएसआय पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा! भरती प्रक्रियेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 322 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत पूर्व आणि मुख्य परिक्षांतील आरक्षणाचा मुद्दा...
Read More
post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More