जगप्रसिद्ध ‘वॉर्नर ब्रॉस’ स्टुडिओत भीषण आग – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

जगप्रसिद्ध ‘वॉर्नर ब्रॉस’ स्टुडिओत भीषण आग

लंडन – लिव्सडनमध्ये जगप्रसिद्ध ‘वॉर्नर ब्रॉस’च्या स्टुडिओत बुधवारी भीषण आगीची घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल १५ गाड्यांसह ७५ जवान घटनास्थळी दाखल झाले. काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेवेळी खबरदारी म्हणून लिव्सडनजवळील वाहतुकीचा पूल पोलिसांनी काहीकाळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे मोठ-मोठे लोण पसरले असून ‘आज आमची सकाळ धुराच्या वासानेच झाली’, असे तेथील नागरिकांनी सांगितले.

जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या हॅरी पॉटर, जेम्स बॉंड, फास्ट अॅण्ड फ्युरियस, मिशन इम्पॉसिबल यांसारख्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या स्टुडिओत झाले आहे. हा स्टुडिओ पाहण्यासाठी दररोज तब्बल ६००० पर्यटक याठिकाणी हजेरी लावतात.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More