छगन भुजबळ नाशिकमध्ये दाखल; कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

छगन भुजबळ नाशिकमध्ये दाखल; कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

नाशिक – तुरुंगातून सुटल्यानंतर आज छगन भुजबळ  जिल्हा दौऱ्यावर येताच ढोल ताशांचा गजर करत समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. डोक्यात ‘मी भुजबळ’ टॅगलाईन लिहलेली गांधी टोपी आणि हातात भुजबळांचे फोटो असलेले पिवळ्या रंगाचे झेंडे घेत समर्थक बेभान होत नाचत होते. अडीच वर्षानंतर प्रथमच शहरातील चौकाचौकात भुजबळांच्या स्वागताचे बोर्ड झळकल्याने अवघे शहर भुजबळमय झाल्याचे चित्र होते. पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज, गणेशवाडीतील महात्मा ज्योतीबा फुले आणि शालिमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भुजबळ नतमस्तक झाले.

जेलबाहेर आल्यानंतर भुजबळ प्रथमच होमपिच असलेल्या नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. 14 ते 19 जूनपर्यंत भुजबळ दौर्‍यावर येत आहेत. भुजबळ आज जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी महामार्गावरील चौकाचौकात एकच गर्दी केली होती. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळांच्या स्वागताचे चौकाचौकात पोस्टर उभारले होते. ढोलताशांचा गजर करत उत्साही अन् आंनदलेले कार्यकर्ते सकाळपासूनच चौकाचौकात नाचत होते. दुपारी साडेबारा वाजता भुजबळांचे पाथर्डी फाटयावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी  एकच जल्लोष केला. भुजबळ साहेब आगे बडो.. घोषणा देत कार्यकत्यांनी परिसर दणाणून सोडला.भुजबळानी छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दौऱ्याला प्रारंभ केला.

त्यानंतर भुजबळ यांचा ताफा पंचवटीमधील गणेशवाडीकडे रवाना झाला. गणेशवाडीतील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर भुजबळ नतमस्तक झाले. यावेळी कार्यकत्यांनी फुले यांच्या नावाचा जयजयकार केला. तेथून भुजबळ थेट शालीमार चौकात गेले. तेथे भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. भुजबळ पाच दिवस मुक्काम ठोकणार असून या दरम्यान ते वणी, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर येथे जात देवदर्शन करणार आहेत. बर्‍याच कालावधीनतंर भुजबळ नाशकात येणार असल्याने आता ते काय मार्गदर्शन करतात याकडे तमाम कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. भुजबळांचा दौरा मोठ्या गाजावाजात व्हावा यासाठी समर्थकांनी कंबर कसली आहे.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

उल्हासनगर,- उल्हासनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला जिवंत ठेवणार्‍यांची शहर जिल्हा अध्यक्षपदी वर्णी न लावता भाजपाला मदत करणार्‍या आमदार ज्योती कलानी यांना पुन्हा शहर जिल्हा अध्यक्ष...
Read More
post-image
News मुंबई

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व सातही धरणे 90 टक्के भरली

मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात धरणे 90 टक्के भरली असून मुंबईसाठी अतिमहत्त्वाचे भातसा धरण 84 टक्के भरले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत चांगला...
Read More
post-image
News मुंबई

कुर्बानीचा ऑनलाईन परवाना 20 ऑगस्टपर्यंत देऊ नका-हायकोर्ट

मुंबई- बकरी ईदनिमित्ताने कोणालाही कुर्बानीचा ऑनलाईन परवाना नियमबाह्यपद्धतीने आणि कोणतीही शहानिशा न करताच कोणालाही परवानगी दिली जात असल्याचे आज उच्च न्यायालयात उघडकीस आल्याने न्यायमूर्ती...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

माजी पंतप्रधान वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला सुरुवात

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्याच्यावर मागील ६६ दिवस एम्स रुग्णालयात उपचार...
Read More