छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित – eNavakal
News आघाडीच्या बातम्या राजकीय

छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित

नागपूर – नुकतेच जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपरोक्ष श्रीगोंदा येथील पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधींना अशा पध्दतीने शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना माज आलाय का? कशामुळे शिवीगाळ करतोय असा सवाल करत माज आलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळ यांना पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी कारण नसताना शिवीगाळ केल्याच्या संदर्भात विशेष हक्काभंगाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. यावेळी आव्हाड बोलताना म्हणाले की, तेथील स्थानिक रहिवाशी भिमराव नलगे यांच्या घरी उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी रात्री दारू पिवून गेले. तेथे जावून नलगे यांच्या घरातील महिलांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात टाकला. त्याचबरोबर भुजबळ यांना अश्लाघ्घ पध्दतीने शिवीगाळ केली. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षक जाधव यास तात्काळ निलंबित करावी अशी मागणी केली.

त्यानंतर अजित पवार यांनी शासकिय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना एखाद्या लोकप्रतिनिधीमार्फत अनवधानाने कोणती गोष्ट झाली. तर त्या अधिकारी-कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ सर्व अधिकारी एकत्रित येत संप अथवा आंदोलन करतात. मात्र लोकप्रतिनिधीचा सन्मान न करता त्याला थेट शिवीगाळ करणे हे काम अधिकारीच करतात. तेव्हा या अधिकाऱ्यांना कशाचा माज आलाय, कशाच्या आधारावर अशा गोष्टी करतात. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोखावता कामा नये.  त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपचे एकनाथ खडसे यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान केला पाहिजे अशी मागणी केली. त्याचबरोबर शिवसेनेचे सुनिल प्रभू यांनी भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. याशिवाय शिवसेनेचे नागेश पाटील आष्टेकर आणि राजेश क्षिरसागर या दोन आमदारांनाही पोलिसांनी मारहाण केल्याची व्हीडीओ क्लीप विधानसभेत दिली होती. त्यास दोन वर्षे झाली तर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

सभागृहातील सदस्यांची भावना अखेर लक्षात घेवून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यास सरकारने तातडीने निलंबित करावे असे आदेश राज्य सरकारला दिले. त्यावर विखे-पाटील यांनी यासंदर्भात सर्वपक्षिय गटनेत्यांची बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनीही त्यास होकार देत सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More