चौथ्या वनडेत भारताची फलदांजी;रोहित शर्मा ५ धावांनंतर बाद  – eNavakal
क्रीडा

चौथ्या वनडेत भारताची फलदांजी;रोहित शर्मा ५ धावांनंतर बाद 

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला आणि आधी  बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये भारताने एक बदल केला आहे. केदार जाधवच्याऐवजी श्रेयस अय्यरला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चौथी लढत जिंकून सहा सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची चांगली संधी आहे. भारताला अद्याप दक्षिण आफ्रिकेत वन-डे मालिका जिंकता आलेली नाही. याआधी भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरिज जिंकता आलेली नाही.  याआधी २०१०-१ मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात २-१ ने पुढे असतांना देखील नंतर भारताचा ३-२ ने पराभव झाला होता.

भारताचे स्पिनर्स युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पहिल्या तीन मॅचमध्ये ३० पैकी २१ विकेट या दोघांनी घेतल्या आहेत. तर विराट कोहलीने  मागच्या मॅचमध्ये १६० रन्सची खेळी केली होती. पण हार्दिक पांड्याचा फॉर्म भारतासाठी चिंतेची बाब असेल.आत्ता खेळपट्टीवर शिखर धवन आणि विराट कोहली खेळत असून शिखर अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More