‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींकडून सुप्रिम कोर्टाची बिनशर्त माफी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींकडून सुप्रिम कोर्टाची बिनशर्त माफी

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’ या घोषणेप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल चुकीच्या पध्दतीने सांगितल्याप्रकरणी कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. राहुल गांधी यांनी आज सुप्रीम कोर्टात नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. राफेल प्रकरणी शुक्रवार 10 मे रोजी सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे.
राफेल करार प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. मागील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला धक्का दिला होता. त्यावर भाष्य करताना ‘आता सुप्रीम कोर्टानेदेखील चौकीदार चोर है, मानले आहे’ अशी प्रतिक्रिया देत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेतला होता. सुप्रीम कोर्टाने असे कोणतेही विधान केलेले नाही, तरीही राहुल गांधी असे विधान करुन न्यायालयाचा अवमान करत असल्याची तक्रार भाजपाने कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना निकाल चुकीच्या पध्दतीने सांगितल्याप्रकरणी तंबी दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या गोेंधळात हे वक्तव्य केले असल्याचे सांगत दोन वेळा चुकीबाबत खेद व्यक्त केला होता. आज राहुल गांधी यांच्या वकिलांनी त्यांच्यावतीने प्रतिज्ञापत्र दाखल करत कोर्टाची बिनशर्त माफी मागितली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More