चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत सात लाखांची लूट – eNavakal
गुन्हे मुंबई

चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत सात लाखांची लूट

मुंबई – अंधेरी येथे बँकेतील चोरीसह घरफोडीच्या दोन गुन्ह्यांत चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना लोअर परेल, कुर्ला आणि अंधेरी परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तिन्ही घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. अंधेरीतील स्माईल चाळीत राहणारे मंसूर शहाबान सिद्धीकी हे 62 वर्षांचे वयोवृद्ध तेथीलच स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. अडीच लाख रुपये काढून त्यांनी काऊंटरवर ठेवले होते. याच दरम्यान तिथे आलेल्या एका चोरट्यांनी ही रक्कम घेऊन तेथून पलायन केले. चोरीची तक्रार प्राप्त होताच एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. लोअर परेल येथील अ‍ॅरोमॅक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सोमवारी घरफोडीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश करुन लॉकरमधील अडीच लाख रुपयांची कॅश पळवून नेली होती. दुसरी घटना कुर्ला परिसरात घडली. पवन नारायण देवांगे हे कुर्ला येथील कामगार वसाहतीत राहतात. सोमवारी सायंकाळी त्यांच्या घरात प्रवेश करुन चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रोकड आणि दागिने पळवून नेले. अवघ्या वीस मिनिटांत ही घरफोडी झाल्याने त्यांना धक्काच बसला होता. या दोन्ही घटनेबाबत ना. म. जोशी आणि कुर्ला पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More