चेन्नईला दरदिवशी दोनदा ट्रेनने पाणीपुरवठा – eNavakal
देश

चेन्नईला दरदिवशी दोनदा ट्रेनने पाणीपुरवठा

चेन्नई – चेन्नईत पाणीटंचाईचा कळस झाला असून, शस्त्रक्रियेसाठीही पाणी खरेदी करण्याची वेळ शहरातील रुग्णालयांवर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणेच मुश्कील झाले आहे. तामिळनाडूत अनेक महिन्यांपासून तलाव, विहिरी, नद्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी आता तामिळनाडूच्या वेल्‍लोर जिल्ह्यातून जोलारपेट येथून चेन्‍नईला दरदिवशी ट्रेनने दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिली ट्रेन आज 25 कोटी लिटर पाणी घेऊन दुपारी 2 वाजता चेन्नईत पोहोचली. चेन्‍नई शहराला पाणी देण्यास वेल्‍लोर जिल्ह्यातील जोलारपेट येथील ग्रामस्थांचा विरोध आहे.

चेन्नईत पुरेसा पाऊस होईपर्यंत वेल्लोरहून दररोज ६५ करोड रुपयांचा पाणीपुरवठा केला जाईल, असे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. एआयएडीएमके सरकारच्या या निर्णयाचे डीएमके नेते एमके स्टालिन यांनीदेखील समर्थन केले आहे. परंतु तामिळनाडूत पाण्याचा भीषण दुष्काळ पडला असल्याने चेन्‍नई शहराला पाणी देण्यास वेल्‍लोर जिल्ह्यातील जोलारपेट येथील ग्रामस्थांचा विरोध आहे.

चेन्नईतील जनता पिण्याच्या पाण्यासाठीही तळमळत आहे. याठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो मात्र त्यासाठी दुप्पट पैसे द्यावे लागतात, जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. शिवाय हंडे घेऊन लांब लांबचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या माध्यमातूनही पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने ट्रेनने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता लियानार्डो डिकेप्रियो यानेदेखील सोशल मीडियावरून चेन्नतील पाणी टंचाईबाबत चिंता व्यक्त केली होती. ‘चेन्नईला या संकटापासून आता केवळ पाऊसच वाचवू शकतो, असे त्याने म्हटले होते.’

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More