चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता – eNavakal
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागत आहे. तेथील विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. लोकांना हंडाभर पाण्यासाठी मोठ-मोठे आंदोलन करावे लागत आहेत. येथील परिस्थिती इतकी भीषण आहे की, अमेरिकन सुपरस्टार ‘टायटनिक’ फेम लिओनार्डो डिकॅप्रियोनेदेखील तामिळनाडूची राजधानी चेन्नईतील पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘हे शहर नष्ट होण्यापासून आता केवळ पाऊसच वाचवू शकतो’, असे त्याने सोशल मीडियावर म्हटले आहे. लिओनार्डो हा पर्यावरणवादी असून नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणासाठी विशेष कार्यरत आहे. पृथ्वीवर होणाऱ्या झाडांच्या कत्तली, आटलेले पाण्याचे प्रवाह, कमी होणारा ओझोनचा थर, याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी आणि या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी लिओनार्डो कार्यरत आहे.

 

View this post on Instagram

 

#Regram #RG @bbcnews: “Only rain can save Chennai from this situation.” A well completely empty, and a city without water. The southern Indian city of Chennai is in crisis, after the four main water reservoirs ran completely dry. The acute water shortage has forced the city to scramble for urgent solutions and residents have to stand in line for hours to get water from government tanks. As the water levels depleted, hotels and restaurants started to shut down temporarily, and the air con was turned off in the city’s metro. Officials in the city continue to try and find alternative sources of water – but the community continue to pray for rain. Tap the link in our bio to read more about Chennai’s water crisis. (📸 Getty Images) #chennai #watercrisis #india #bbcnews

A post shared by Leonardo DiCaprio (@leonardodicaprio) on

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More