चेन्नईचे पुनरागमन धोनीसोबतच, रैनाचं सीएसकेत कमबॅक – eNavakal
क्रीडा मुंबई

चेन्नईचे पुनरागमन धोनीसोबतच, रैनाचं सीएसकेत कमबॅक

मुंबई- इंडियन प्रीमियर लीगचा ११ व्या हंगामातील लिलावापुर्वी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी नव्या नियमानुसार संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे गुरुवारी जाहीर केली. दोन वर्षांच्या बंदीनंतर ११ व्या आयपीएल स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या चेन्नई संघाने अपेक्षेप्रमाणे महेंद्रसिंह धोनीला संघात कायम ठेवले आहे. धोनीसोबत अष्टरैलू रविंद्र जडेजा आणि सुरेश रैना यांच्यावर देखील चेन्नईने भरवसा दाखवला आहे. यापूर्वी चेन्नईकडून खेळलेल्या ब्रावोला  ‘राईट टू मॅच’ कार्डच्या माध्यमातून संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मासह पांड्या बंधूंना पसंती दिली आहे. हार्दिक पांड्यांसह मुंबईने  कुणाल पांड्या संघात कायम ठेवले आहे.  याशिवाय दिल्लीने मॉरिस, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने ख्रिस लेनस आणि सुनील नरेन यांच्यावर विश्वास दाखवला आहे. सनराझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि नवोदित  दिपक हुड्डाच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने  विराट कोहली, युजवेंद्र चहल आणि एबी डिव्हिलियर्सला आपल्या संघात कायम ठेवले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More