चेंबूरचे मनसे नेते कर्णबाळा दुनबळेंवर हल्ला – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

चेंबूरचे मनसे नेते कर्णबाळा दुनबळेंवर हल्ला

मुंबई – मनसेचे चेंबूर विभाग प्रमुख यांच्यावर शनिवारी रात्री तलवारीने वार करण्यात आले. कर्णबाळा यांच्या राहत्या घराजवळ सिंधी सोसायटीत ही घटना घडली. या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तेथून सुराणा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी तीन ते चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

१० ते ११ जणांच्या गटाने दुनबळेंवर लोखंडी रॉड आणि तलवारीने हल्ला केल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, दुनबळे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गेल्या आठवड्यात मनसे चेंबूर शाखाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले होते. तसेच गेल्याच महिन्यात शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावरही मानखुर्दमध्ये प्राणघातक हल्ला झाला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More