चेंगराचेंगरी घडवू असे आरोप का? मराठा समाज मुख्यमंत्र्यांवर भडकला – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन राजकीय

चेंगराचेंगरी घडवू असे आरोप का? मराठा समाज मुख्यमंत्र्यांवर भडकला

मुंबई – मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगरात गोळीबार झाल्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पंढरपुरात विठ्ठलाच्या महापुजेला जाण्यापासून रोखण्यात आले होते. 1996 सालच्या या घटनेनंतर आज मराठा आरक्षणासाठी लढणार्‍या सकल मराठा कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरची महापूजा रद्द करावी लागली. उद्या ही महापूजा मानाच्या वारकर्‍यांच्या हस्ते केली जाईल.

आपण पंढरपुरात महापुजेला जाणार नसल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळी ते म्हणाले की, आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात आहे हे माहीत असूनही आरक्षणासाठी आंदोलन करून तणाव निर्माण केला जात आहे. मात्र 2014 साली सत्तेवर येण्यापूर्वी निवडणूक प्रचारात भाजपाने आश्वासन दिले होते की, सत्तेवर येताच मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्यांनी हे आश्वासन दिले तेव्हाही आरक्षणाचा मुद्दा न्यायालयातच होता. न्यायालयाच्या सांगण्यावरून नारायण राणेंनी अहवाल तयार केला होता. मुख्यमंत्री आणि भाजपाला हे माहीत असूनही त्यांनी धनगर व मराठा समाजाला आश्वासन देत सत्ता गाठली. त्यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा कोर्टात आहे हे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे मराठा समाजाला मान्य नाही. साप सोडू, चेंगराचेंगरी करू, असा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाज आरक्षणासाठी वारकर्‍यांचे प्राण पणाला लावतील असा मुख्यमंत्र्यांनी आडमार्गाने आरोपच केल्याने मराठा समाज अधिकच खवळला आहे. आरक्षणासाठी आम्ही वारकर्‍यांचे प्राण पणाला लावू असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे योग्य नाही. आम्ही असे कट रचले हे सांगून आमची बदनामी का केली जात आहे? मराठा समाजाचे कार्यकर्ते पुढे म्हणाले की, भरती रद्द व्हावी ही मागणी आहे कारण आम्हाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाला आधारच नाही. त्यामुळे नुसती भरती झाल्याचा दिखावा होणार आहे. ज्या मराठा आरक्षण आंदोलनावर स्वार होऊन सत्ता मिळविली तेच सरकार आता मराठा आंदोलन राजकीय हेतूने पसरवले जात असल्याचा आरोप का करीत आहे? सत्तेत येण्यापूर्वी आमच्या आंदोलनात सामील होता याचा विसर पडला आहे का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुजेला न जाण्याचा निर्णय जाहीर केला त्यापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख हे पंढरपुरला जाण्यास निघाले. माचणूर येथे त्यांचा ताफा मराठा कार्यकर्त्यांनी रोखला. यावेळी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यावर मुख्यमंत्र्यांना फोन लावण्यात आला. न्यायालयाने मान्य करताच आरक्षण लागू करू असे मुख्यमंत्री म्हणाले. तेव्हा कोर्टाचा निकाल लागल्यावरच या असे सांगून कार्यकर्त्यांनी सुभाष देशमुख आणि महाजन यांना सोडले. पंढरपुर येथील विश्रामगृहावर ना.गिरिष महाजन ना.सुभाष देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख माजी मंत्री शोभाताई फडणवीस आमदार प्रशांत परिचारक जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले जिल्हा पोलीस प्रमुख डॉ विरेश प्रभू मंदिर समिती चे अध्यक्ष डॉ अतुल बाबा भोसले यांची गुप्त बैठक झाली या बैठकी नंतर पत्रकार परिषदेत ना.महाजन यांनी सांगितले की पंढरपुर आषाढी यात्रा म्हणजे पायी चालत येणार्‍या येणार्‍या लाखो वारक-यांचा आनंद सोहळा आहे आणि मी महापूजेसाठी येण्याने वारक-यांना त्रास होणार आसेल तर मी पंढरपुर चा दौरा रद्द करीत आहे कारण वारक-यांची सुरक्षितता महत्वाची आहे असे ना.फडणवीस यांनी सांगितल्याचे ना.महाजन म्हणाले.

मंत्र्यांची खोटी आश्वासने
गिरीश महाजन यांनी सहा महिन्यात आरक्षण मिळेल असे कार्यकर्त्यांसमोर म्हणताच आम्हाला लेखी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी दिली. सुभाष देशमुख यांनी तर कार्यकर्त्यांची फसवणूक करीत म्हटले की पुढील वारीपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन. पुढीलवर्षी ऑगस्टपर्यंत विधानसभा निवडणुका लागणार अज्ञाहेत. त्यामुळे सुभाष देशमुखांची मंत्रीपद त्यागाची घोषणा निरर्थक ड्रामेबाजी आहे हे उघड आहे.

एकीकडे मंत्री सुभाष देशमुख आणि गिरीश महाजनंना परत पाठवले गेले आणि दुसरीकडे आंदोलनाचा जोर आज पाचव्या दिवशीही वाढत होता. बार्शीला एकही एसटी चालली नाही. पोलीस संरक्षण मिळत नाही तोवर एसटी चालवणार नाही, असा निर्णय स्थानिक एसटी प्रशासनाने घेतला. वाडा येथे बसची तोडफोड झाली. पंढरपुरात पोलीस आयजी नांगरे पाटील यांनी काल वाखरी येथे जाऊन पालखी तळावर जमलेल्या दिंड्यांना आवाहन केले की, आंदोलन स्थगित करा अशी तुम्ही जाहीरपणे विनंती करा. तेही वारकर्‍यांनी फेटाळून लावत कोणतेही आवाहन करण्यास नकार दिला.
पण अखेर विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या 10 लाख वारकर्‍यांची भावना लक्षात घेऊन औरंगाबाद मराठा संयोजक समितीने पंढरपूर येथील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. उद्याचा एक दिवस पंढरपूरातील आरक्षण आंदोलन स्थगित ठेवले जाईल. मात्र राज्यात इतरत्र आंदोलन सुरू राहील किंबहुना अधिक तीव्र होईल, असे समितीने जाहीर केले. परंतु पंढरपुरातील आंदोलन स्थगित केल्यावरही मुख्यमंत्र्यांनी महापूजेला येणार नसल्याचे जाहीर केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस – रविंद्र वायकर यांच्यात संघर्ष पेटला

मुंबई –  आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता

नवी दिल्ली – स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालानुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’...
Read More