चुनाभट्टीमध्ये ओव्हरहेड वायरमध्ये छत्री अडकली – eNavakal
News मुंबई

चुनाभट्टीमध्ये ओव्हरहेड वायरमध्ये छत्री अडकली

मुंबई – चुनाभट्टी स्थानकातील ओव्हरहेड वायरमध्ये छत्री अडकल्यामुळे हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. रात्री 8 वाजून 3 मिनिटे ते 8 वाजून 17 मिनिटे या काळात डाऊन पनवेल लोकल जीटीबी नगर स्थानकात सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आली.
छत्री अडकल्याची माहिती मिळताच मध्य रेल्वेने आपत्कालीन ब्लॉक घेत ओव्हर हेड वायर मधील वीज पुरवठा खंडित करून छत्री काढली. या घटनेमुळे डाऊन मार्गावरील लोकल फेर्‍या सुमारे 15 मिनिटे विलंबाने धावत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली. दरम्यान गुरुवारी सकाळी रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे कार्यालयात पोहचणार्‍या प्रवाशांना लेटमार्कचा सामना करावा लागला होता. रात्री छत्री अडकल्यामुळे घरी परतणार्‍या प्रवाशांना देखील विलंब यातना सहन कराव्या लागल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More