“चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही,” फडणवीसांना ठाकरेंचा टोला – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

“चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही,” फडणवीसांना ठाकरेंचा टोला

सोलापूर – राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषेदत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. पाहणी दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”मदत किती, कशी? कधी करायची, याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत काम सुरू आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. पंचनामे पूर्ण होत आले आहेत. आढावा घेणं सुरू आहे. जी मदत करता येईल, ती केल्याशिवाय राहणार नाही. सणासुदीला राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही. केंद्राकडून जीएसटी येणं बाकी आहे. पण दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरून प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस यांनी केलेल्या टीकेकडे कसं बघता, असा प्रश्न करण्यात आला. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले,”याकडे बघायला मला वेळच नाहीये. शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझं लक्ष असल्यानंतर, हे चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

तेलंगणामध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाईसाठी तात्काळ मदत घोषित केली. त्याचं वाटपही सुरू झालं आहे, असा मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. या मुद्यावर बोलताना ठाकरे म्हणाले,”चांगलं आहे. माझा एक स्वभाव आहे, जे करायचं ते व्यवस्थित करायचं. जोरात सुरूवात करायची, नंतर अडकलं. त्याला काही उपयोग नाही. जाहीर करायचं व करू नाही शकलो, तेही उपयोगी नाही. जे करू ते ठोस व ठाम करू. मुंबईत काम सुरू आहे. एक दोन दिवसात दसरा आहे. नंतर दिवाळी आहे, अशा स्थिती मी जनतेच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

“चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही,” फडणवीसांना ठाकरेंचा टोला

सोलापूर – राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

“बाबांच्या निर्णयाचं दुःख, पण मी भाजपमध्येच राहणार”, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई – भाजपविरोधातील नाराजी खुलेआम उघड करणारे एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच स्थरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई राजकीय

Eknath Khdase Resign: ‘लौट सके तो आ जाओ’, भाजपच्या नेत्यांची खडसेंना विनंती

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजाप पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी आज भाजपला रामराम ठोकला. त्यांनी पक्ष सोडला असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादीचे जयंत...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

विनयभंगाचा खोटा आरोप लावला, फडणवीसांच्या त्रासाला कंटाळून भाजप पक्ष सोडला- एकनाथ खडसे

जळगाव – भाजप पक्षातील इतर कोणावरच नाराज नाही, मात्र भाजप पक्ष फडणवीसांनी दिलेल्या त्रासामुळे सोडतोय. त्यांनी विनाकारण माझ्यावर खोटे आरोप लावले. विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

ठरलं! एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई – भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार...
Read More