चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी पाकिस्तानी जनता आक्रमक;दोन जणांचा मृत्यू  – eNavakal
आंदोलन गुन्हे विदेश

चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी पाकिस्तानी जनता आक्रमक;दोन जणांचा मृत्यू 

कराची : पाकिस्तानमधील एका ८ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना पंजाब प्रांतात घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात या चिमुरडीचे अपहरण कासुर जिल्ह्यातील तिच्या राहत्या घरासमोरून करण्यात आले होते . मंगळवारी तिचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगात आढळला . पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनात बलात्कारानंतर गळा दाबून या चिमुरडीची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले . संबंधित चिमुरडी आई-वडील तीर्थयात्रेसाठी गेले असताना ती आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. पोलिसांनी या घटनेत चार संशयितांना ताब्यात घेतले.
मुलीला सोबत घेऊन जाताना एक व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या व्यक्तीची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, या घटना सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहचल्यानंतर लोकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन सुरू केलं. आंदोलनकर्त्यांनी कासुर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर दगडांचा वर्षावही केला. यामुळे पूर्ण शहर एक दिवस बंद राहीले. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. याच दरम्यान गोळी लागल्याने जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याच्या मुदतीत वाढ

नांदेड – राखीव जागेवर निवडून आलेल्‍या उमेदवारांनी त्‍यांचे जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्याऐवजी बारा महिण्‍यात सादर करण्‍याबाबत अद्यादेश जारी करण्‍यात आला आहे. सदर सुधारणा अद्यादेशामुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच शिवसेना नेतृत्वाला अल्टीमेटम?

मुंबई – केंद्रात आणि राज्यात युतीत असलेल्या शिवसेनेने अनेकवेळा भाजपवर टीका करत एकला चलो रे, ची साद दिली आहे.  मात्र, आज भाजप पक्षश्रेष्ठीनीच शिवसेनेची कोंडी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More