चित्रपट निर्माता हार्वे वीनस्‍टीनने माझे लैगिंक शोषण केले, हॉलिवूड अभिनेत्रीचा आरोप – eNavakal
ट्रेंडिंग विदेश

चित्रपट निर्माता हार्वे वीनस्‍टीनने माझे लैगिंक शोषण केले, हॉलिवूड अभिनेत्रीचा आरोप

कॅलिफोर्निया –हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने दिग्‍दर्शक-निर्माता हार्वे वीनस्‍टीनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सलमाने न्‍यूयॉर्क टाईम्‍समध्‍ये यासंबंधी लेख लिहून खुलासा केला आहे. त्‍यामध्‍ये सलमाने म्‍हटले आहे की, ‘हार्वेंना गुणवत्‍तेची परख आहे. मात्र ते एक राक्षसी व्‍यक्‍ती आहेत. सलमाने न्‍यूयॉर्क टाईम्‍समध्‍ये लेख लिहून वीनस्‍टनवर आरोप केले आहेत.  त्‍यामध्‍ये सलमाने म्‍हटले आहे की, ‘माझ्यासोबत वीनस्‍टनने जे काही केले ते खूप भयानक होते. यातून सावरण्‍यासाठी मला खूप प्रयत्‍न करावे लागले. स्‍वत:चे ब्रेनवॉश करावे लागले. ‘या राक्षसाच्‍या झगमटामुळे कित्‍येक लोकांवर त्‍याचा प्रभाव पडतो. वीनस्‍टनने मला अनेक वर्षे त्रास दिला. माझ्या जीवनाच्‍या त्‍या क्षणांबद्दल सांगताना मला आजही लाज वाटते.’, असे सलमाने म्‍हटले आहे. सलमाने लिहिले आहे की, ‘मला वीनस्‍टनला माफ करण्‍याच्‍या माझ्या क्षमतेबद्दल गर्व होता. मात्र जेव्‍हा अनेक महिलांनी वीनस्‍टनच्‍या कृत्‍यांना वाचा फोडली तेव्‍हा मला माझ्या भित्रेपणाची जाणीव झाली. त्‍यानंतर वीनस्‍टनने माझ्यासोबत जे काही केले तेही जगासमोर आणण्‍याचे मी ठरवले. ‘माझ्यासोबत जे काही घडले ते समुद्रातील एका थेंबासमान आहे. मला वाटले होते की, क्‍वचितच कोणी माझ्या दु:खाला समजून घेऊ शकेल. मला त्‍या महिलांपासून हिंमत मिळाली ज्‍यांनी राष्‍ट्राध्‍यक्षांवरही शोषणाचे आरोप करण्‍याचे धाडस केले. यावरुन हेच सिद्ध होते की, शक्‍तीशाली व्‍यक्‍ती वाट्टेल ते करु शकतात.’

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More