चाळीसगाव परिसरात नरभक्षक बिबट्याचा पाचवा बळी कापूस वेचणार्‍या महिलेवर हल्ला  – eNavakal
पर्यावरण महाराष्ट्र

चाळीसगाव परिसरात नरभक्षक बिबट्याचा पाचवा बळी कापूस वेचणार्‍या महिलेवर हल्ला 

जळगाव :
प्रतिनिधी-
जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुका व परिसरात नरभक्षक बिबट्याची दहशत कायमच असून काल  दुपारी वरखेड परिसरात गिरणा नदी लगतच्या शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या सुसाबाई भिल या महिलेवर झडप घालून तिचे लचके तोडून बिबट्याने महिलेस ठार मारले .या नरभक्षक बिबट्याचा हा पाचवा बळी असून त्यास दिसताक्षणी गोळी मारण्याच्या आदेशासाठी आता खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार आहे .
चाळीसगाव परिसरातील पळसमणी शिवारातील गिरणा नदी लगतच्या अमर नाईक यांच्या शेतात 10 ते 12 मजूर कापूस वेचणी करीत असतांना मागून येऊन बिबट्याने सुसाबाई यांच्यावर झडप घालून त्यांना ओढतच नेले आणि त्यांच्या मान व डोक्याचे लचके तोडत त्यांना ठार मारले .या नरभक्षक बिबट्याचा गेल्या पंधरा दिवसातील हा दुसरा तर एकूण पाचवा बळी होता .
काळाच्या घटनेनंतर सार्‍या परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे .ग्रामस्थांनी वन विभाग अधिकार्‍यांना घेराव घालून या नरभक्षक बिबट्याचा तातडीने  बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे .दरम्यान या बिबट्यास दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश व्हावेत यासाठी खंडपीठात यचिका दाखल करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More