चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या – eNavakal
मुंबई

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

वसई – नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारिञ्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे.
पत्नी रात्रीच्या वेळी झोपेत असताना पतीने डोके व गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

शालिनी मालियारी गौडा (३२) असे मृत महिलेचे नाव असून मालियारी गौड (35) असे आरोपीचे नाव आहे. पती मालियारीला आपल्या पत्नीचे बाहेर कुणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. मालियारी हा एका हॉटेलमध्ये नोकरी करायचा, तो दररोज दुपारी दोन वाजता कामावर जाऊन रात्री उशिरा घरी परतायचा, शुक्रवारी रात्री पहाटे तीनच्या सुमारास अचानक मालियारीने आपली पत्नी झोपेत असतानाच तिच्या डोक्यावर व गळ्यावर कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केली आणि तो तिथून निघून गेला. शनिवारी सकाळी या घटनेनंतर शालिनीचा भाऊ संपत याला समजताच त्याने तुळींज पोलिसांना माहिती दिली, संपत याच्या फिर्यादीवरून तुळींज पोलिसात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ

मुंबई – आज सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली असून सोन्याने ३४ हजार ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या दराने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा १९ वर्षांपूर्वीचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

त्रालमध्ये चकमक! एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More