चारा घोटाळा- लालू प्रसाद यादव यांच्यासह 16 दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी – eNavakal
गुन्हे देश राजकीय

चारा घोटाळा- लालू प्रसाद यादव यांच्यासह 16 दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी

रांची – चारा घोटाळ्याप्रकरणी राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यासह १६ जणांना आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात शिक्षा सुनावली जाणार आहे. रांचीमधील सीबीआय कोर्ट आज सकाळी 11 वाजता सर्व दोषींना शिक्षाची सुनावणी होणार आहे. कोर्टाचे वकील विंदेश्वरी प्रसाद यांचे काल (3 जानेवारी) निधन झाल्याने रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाने शिक्षेची सुनावणी आजपर्यंत पुढे ढकलली होती.

२१ वर्षांपूर्वी बिहारमध्ये झालेल्या या घोटाळ्यामुळे संपूर्ण देशभरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या घोटाळ्यात लालूंसहित १६ जणांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांची बिरसा मुंडा तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. काल या सर्वांना शिक्षा सुनावली जाणार होती, मात्र वकीलाच्या निधनामुळे एक दिवसासाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने याप्रकरणी तेजस्वी यादव, रघुवंशप्रसाद सिंह, शिवानंद तिवारी आणि मनीष तिवारी यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याचे न्यायालयाने सांगितले

काय आहे चारा घोटाळा?

चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. न्यायालयाने लालूंसहित १६ जणांना दोषी ठरवले होते. या १६ जणांना ताब्यात घेऊन बिरसा मुंडा तुरूंगात पाठवण्यात आले होते. न्यायालयाने ९५० कोटी रूपयांच्या चारा घोटाळ्याशी निगडीत देवघर कोषागारमधून ८९ लाख २७ हजार रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी हा निर्णय दिला होता. याप्रकरणी एकूण ३८ जणांना आरोपी ठरवण्यात आले होते. यातील ११ जणांचा मृत्यू झाला. तिघे सीबीआयचे साक्षीदार झाले. तर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला होता. त्यामुळे त्यांना २००६-०७ मध्येच शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर २२ आरोपी राहिले होते.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

ससून रुग्णालय अजून सज्ज का नाही?

पुणे – ससून रुग्णालयाची नवी इमारत बांधून तयार आहे. तिथे कोरोना रुग्णांसाठी ८५० खाटांचे स्वतंत्र दालन सुरू होऊ शकते. हे दालन सुरू होईल असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यांतून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More