चापेकर चौकातील पुलावर मालवाहतूक करणा-या ट्रकला आग – eNavakal
News महाराष्ट्र

चापेकर चौकातील पुलावर मालवाहतूक करणा-या ट्रकला आग

पिंपरी –  चिंचवड, चापेकर चौकातील पुलावरुन जाणा-या एका मालवाहतूक ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. ट्रकचा टायर फुटल्याने धुराचे लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. ही घटना दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 12 एचडी 0220 या क्रमांकाचा मालवाहतूक ट्रक शुक्रवारी खेड-शिवापूरवरुन माल घेऊन आला होता. पिंपरीतील एका कंपनीत माल खाली केल्यानंतर चालक शिवाजी सावंत हे हा ट्रक घेऊन आज शनिवारी दुपारी खेड-शिवापूरला चालले होते. दुपारी सव्वादोनच्या सुमारास चापेकर चौकातील पुलावरुन थेरगावकडे जात असताना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ट्रकला आग लागली. यामध्ये ट्रक जळून खाक झाला आहे.

टायर फुटल्याने मोठा आवाज होऊन धुराचे लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पिंपरी, संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे दोन बंब आणि प्राधिकरणातील एक असे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 15 मिनिटाच्या आतमध्ये आग आटोक्यात आणली, अशी माहिती फायरमन अशोक कानडे यांनी दिली. दरम्यान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More