चाकण बाजारपेठेत कांद्याच्या आवकेत वाढ – eNavakal
News महाराष्ट्र

चाकण बाजारपेठेत कांद्याच्या आवकेत वाढ

चाकण – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ होऊन भावात 70 रुपयांची किरकोळ वाढ झाली. बटाटा, लसूण व वांग्याचे भाव या आठवड्यात स्थिर राहिले आहेत. जळगाव भुईमुंग शेंगा, भेंडी, दुधीभोपळा व काकडीची मोठी आवक होवूनही भावात वाढ झाली आहे. चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची आवक घटली. चाकणला गुरांच्या बाजारात या आठवड्यात जर्शी गाई व म्हशींच्या संख्येत घट होवूनही त्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. एकुण उलाढाल 4 कोटी 10 लाख रुपये झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण 41 हजार 605 क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक वाढूनही कांद्याच्या भावात 70 रुपयांनी वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 505 रुपयांवरून 575 रुपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1,420 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 320 क्विंटलने वाढल्याने बटाट्याचा भाव 1 हजार 300 रुपयांवरच स्थिरावला. जळगाव भुईमुंग शेंगांची एकुण आवक 4 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटलने वाढूनही भावात 800 रुपयांची वाढ झाली. या शेंगाचा कमाल भाव 5 हजार 200 रुपयांवरून 6 हजार रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक 7 क्विंटल झाली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More