चाकणच्या कृषी बाजारात कांदा व बटाट्याची विक्रमी आवक – eNavakal
News महाराष्ट्र

चाकणच्या कृषी बाजारात कांदा व बटाट्याची विक्रमी आवक

चाकण – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांदा व बटाट्याची मोठी आवक झाली. प्रचंड आवक झाल्याने कांद्याचे भाव मात्र या आठवड्यात गडगडले. बटाट्याची आवक वाढून भाव स्थिर राहिले. जळगाव भुईमुग शेंगाची आवक घटूनही भावात घसरण झाली. लसणाची आवक घटल्याने भावात मोठी वाढ झाली आहे. मेथी व कोथिंबीर यांची किरकोळ आवक झाली. चाकणला गुरांच्या बाजारात या आठवड्यात जर्शी गाई, बैल व म्हैस यांची संख्या घटली आहे. शेळ्या – मेंढ्याची संख्या वाढूनही त्यांचे भाव स्थिर राहिले. एकुण उलाढाल 4 कोटी 10 लाख रुपये झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण 40 हजार क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 17 हजार 500 क्विंटलने वाढल्याने कांद्याच्या भावात 200 रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव 900 रुपयांवरून 700 रुपयांवर घसरला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More