‘चांद्रयान २’ १४ ऑगस्टला चंद्राकडे रवाना होणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

‘चांद्रयान २’ १४ ऑगस्टला चंद्राकडे रवाना होणार

नवी दिल्ली – ‘चांद्रयान २’द्वारे चंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास सुरू आहे. या यानाचे प्रक्षेपण झाल्यानंतर त्याच्या प्रवासाबाबत इस्रोकडून वेळोवेळी माहिती दिली जात आहे. १४ ऑगस्ट रोजी हे यान पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या दिशेने रवाना होणार असून २० ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहचेल आणि ७ सप्टेंबर रोजी चांद्रयान-२ चंद्रावर उतरेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी सोमवारी दिली.

डॉ. सिवन म्हणाले, १४ ऑगस्टच्या पहाटे ३.३० मिनिटांनी चांद्रयान-२ची कक्षा बदलण्यात येणार आहे. त्यानुसार, हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाईल, याला ट्रान्स लुनार इंजेक्शन असे म्हणतात. त्यानंतर हे यान चंद्राच्या दिशेने रवाना होईल. यादरम्यान ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेतून जाईल. या प्रक्रियेनंतर पुढील ८ दिवसांत म्हणजेच २० ऑगस्ट रोजी चंद्राजवळ पोहोचेल, त्यानंतर यानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येईल. अखेर ७ सप्टेंबर रोजी चांद्रयान-२ चंद्रावर उतरेल. यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी चांद्रयान-२च्या कक्षेत पाचव्यांदा बदल करण्यात आला होता. इस्रोने दुपारी ३ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-२च्या कक्षेत वाढ केली होती.

दरम्यान, २२ जुलै रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन इस्रोने चांद्रयान-२चे प्रक्षेपण केले होते. इस्रोचे सर्वात शक्तीशाली रॉकेट जीएसएलव्ही मार्क ३च्या मदतीने हे प्रक्षेपण झाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

भारतात २४ तासांत २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात हाहाकार माजवला आहे. देशात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली...
Read More
post-image
विदेश

अमेरिकेने डब्ल्यूएचओ सोडले! संघटनेवर चीनच्या वर्चस्वाचा आरोप

वॉशिंग्टन – कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून जागतिक आरोग्य संघटनेवर नाराज असलेल्या अमेरिकेने या संघटनेचा निधी बंद केल्यानंतर आता या संघटनेतून बाहेर पडल्याचा निर्णयच जाहीर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला २८ दिवसांचा फर्लो मंजूर! लवकरच घरी परतणार!

नागपूर – अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला पुन्हा एकदा 28 दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला मंगळवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये २४ तासांत सेनेच्या २ नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधीही आता त्याचे बळी ठरत आहेत. त्यात गेल्या २४ तासांत...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ सौरव गांगुली

आज ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नोंद झालेल्या भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वाढदिवस. त्याचा जन्म ८ जुलै १९७२ रोजी...
Read More