चव्हाण दाम्पत्य यंदा विठ्ठलाच्या महापूजेचे मानकरी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

चव्हाण दाम्पत्य यंदा विठ्ठलाच्या महापूजेचे मानकरी

पंढरपूर – आज संतांच्या माहेरघरी आनंदोत्सव साजरा होत आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांनी आज आषाढी एकादशीच्या चंद्रभागेच्या तीरावर पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आणि अवघी पंढरी दुमदुमून गेली. परंपरेप्रमाणे आज पहाटे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा केली. तर त्यांच्यासह लातूरच्या वारकरी शेतकरी दांपत्याला महापूजेचा मान मिळाला. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेवाडी तांडा या गावचे वारकरी विठ्ठल चव्हाण व प्रयागबाई चव्हाण या दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी चव्हाण दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावणारा नव्हता. सुमारे दीड तास मंत्रोच्चारांच्या साक्षीनं हा पूजा विधी पार पडला.

शेतकरी असलेले चव्हाण हे वारकरी दाम्पत्य १९८० पासून सलग ३९ वर्ष वारीला येत आहेत. यापुढेही पंढरीची वारी अखंड सुरू राहूदे आणि शेतकरी सुखी राहूदे, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महाराष्ट्रातला दुष्काळ नाहीसा व्हावा, भरपूर पाऊस पडावा, ही मागणी त्यांनी विठ्ठलाकडे केली.

आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर शासकीय महाआरती पार पडली. महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि चव्हाण यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली. विठ्ठलाची पूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि वारकरी चव्हाण दांपत्याचे विठ्ठल मंदिराच्या मागिल बाजूला असलेल्या रुक्मिणी मातेच्या मंदिरात पूजा केली. यावेळी रुक्मिणीला दुग्धाभिषेक घालून चंदनाचा लेप लावत वस्त्रे परिधान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि चव्हाण यांच्या पत्नीने ओटी भरली. यानंतर सोहळा समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल चव्हाण दांपत्याला चांदीची विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More